Delhi Election Result 2025 Memes Saam Tv
देश विदेश

Delhi Election 2025 Memes : दिल्ली भाजपची, आपचा पत्ता कट; निवडणूक निकालानंतर मीम्सचा महापूर, बघून खळखळून हसाल

Delhi Election 2025 Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला. तर आपचा पराभव झाला. या निवडणूक निकालांच्या दरम्यान सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Yash Shirke

Delhi Election Result Memes : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी ३९ जागा जिंकल्या आहेत. तर सलग तीन वेळा सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पार्टीने फक्त १७ जागांवर विजय मिळवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. या निकालावरुन सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल होत आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, भाजपने जवळपास ४८ जागा मिळवल्या आहेत. तर आपने २२ जागांवर वर्चस्व टिकवले आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदार संघात पराभव झाला आहे. केजरीवाल यांच्यासह आपच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप वि. आप वि. काँग्रेस अशी तिरंगी लढत होती. या लढतीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१३ पासून दिल्लीत आपची सत्ता होती. आम आदमी पक्षाचा दिल्लीचा प्रमुख गड भाजपकडे गेला आहे. दुसऱ्या बाजूला दिल्लीत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.

मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलनुसार, आपची सत्ता जाणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आता एक्झिट पोलची माहिती खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालादरम्यान एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अनेक राजकीय मीम्स पोस्ट होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT