देश विदेश

Delhi Election: शॉर्टकट राजकारणाचे 'शॉर्ट सर्किट झालं', काँग्रेस आणि 'आप' ला पंतप्रधान मोदींनी झोडपलं

PM Modi Speech : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

Bharat Jadhav

दिल्लीच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं. या प्रेमाची परतफेड मी विकासाने करीन, असे वचन देतो. दिल्लीकरांमध्ये विजयाचा आनंद आहे. दिल्लीला 'आप-दा'पासून मुक्त केल्याचं आपल्याला समाधान आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदीनी आम आदमी पक्षाला टोला मारलाय. दिल्लीमध्ये २७ वर्षानंतर कमळ फुललंय. विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. तर आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झालाय. भाजप कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत आहेत. विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीमध्ये भाजपने इतिहास रचलाय. दिल्ली हे हिंदुस्तान आहे. हे शहर म्हणजे एक छोटं भारतच आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारताचा विचाराने जगतेय. दिल्लीत दक्षिण भारताचेही लोक आहेत. पश्चिम आणि पूर्वे भागाकडीलही लोक दिल्लीत राहतात. आज याच विविधता असलेल्या दिल्लीने मोठ्या मताधिक्याने भाजपला जिंकवलंय. दिल्लीतील प्रत्येक भागात कमळ फुललंय. प्रत्येक दिल्लीकरांनी भाजपला आशीर्वाद दिलाय, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, दिल्लीच्या जनतेने प्रत्येक वेळी आमच्यावर विश्वास ठेवलाय. आज दिल्लीनेही आमची विनंती मान्य करून आम्हाला दिल्लीत सेवा करण्याची संधी दिली. आता दिल्लीतील तरुणांना येथे भाजपचा सुशासन दिसेल,असं मोदी म्हणालेत. पीएम मोदी पुढे म्हणाले, आज दिल्लीच्या जनतेने स्पष्ट केलं की, दिल्लीचे खरे मालक फक्त दिल्लीचे लोक आहेत. दिल्लीचे धनी असल्याचा अभिमान बाळगणाऱ्यांना सत्याचा सामना करावा लागला. राजकारणात शॉर्टकट, लबाडी आणि फसवणुकीला जागा नाहीये, हेही दिल्लीच्या जनादेशावरून स्पष्ट झालं.

शासन करणं हे नाटक करण्याचं काम नाहीये. विरोधी पक्षाचेनेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंदिरात गेले. गळ्यात देखाव्यासाठी माळ्या घातल्या. पण भाजप तसे नसून आम्ही जमिनीवर राहून कामं करू. दिवस-रात्र आम्ही दिल्लीकरांची सेवा करू, संपूर्ण देशाला माहितीये, जेथे एनडीएचं शासन आहे, तेथे सुशासन, विकास आणि विश्वास आहे. एनडीए सरकारचा उमेदवार लोकांच्या हिताचं काम करतात.

देशातील ज्या राज्यात एनडीएला यश आले आहे, त्या राज्य विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचले आहे. यामुळेच भाजपला वारंवार विजय प्राप्त होतोय. लोक आमच्या सरकारला एक नाही तीन-तीनवेळा निवडणून देत आहे. उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेशात एनडीएची दुसऱ्यांदा सत्ता आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

SCROLL FOR NEXT