Crime News Saam Tv
देश विदेश

Delhi Crime News : तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या, चाकूने केले ६० वार; कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला

प्रविण वाकचौरे

Delhi Crime News :

देशाची राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा क्रूर घटनेने हादरली आहे. अवघ्या ३५० रुपयांसाठी एका अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलाच्या त्याच्या शरीरावर जवळपास ६० वार केले. दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत मंगळवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११.१५ वाजता एका पीसीआर कॉलवर माहिती मिळाली की जनता येथे दरोडा टाकताना एका अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठलं आणि पीडित तरुणाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत तरुणाच्या शरीरावर ६० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडित तरुणाचे तोंड दाबले, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर त्याने तरुणावर चाकूने वार करून त्याच्याकडील ३५० रुपये हिसकावले. (Latest Marathi News)

घटनेच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. हत्येमागे लुटमार हेच कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT