viral video twitter
देश विदेश

Crime: राजधानीत Money Heist; धाड धाड गोळ्या झाडल्या अन् ८० लाख लुटले,CCTV VIDEO व्हायरल

Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवून ८० लाख चोरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारताची राजधानी दिल्लीत चक्क ८० लाखांची चोरी झाल्याची घटना घडलीये. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललीये. यावेळी चोराने बंदुकीचा धाक दाखवून आणि फायरींग करुन व्यापाऱ्यांकडून ८० लाख रुपये लंपास केले आणि पळ काढला आहे. ही घटना लाहोरी गेट पोलिस स्थानकातील हवेली हैदर चांदणी चौक परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यापारी बॅग घेऊन जाताना दिसून येत आहे. त्यावेळी हा दरोडेखोर त्याचा पाठलाग करतो. संधी मिळताच हा दरोडेखोर आपली बंदूक काढतो आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये झटापट होते.

बॅग हिसकावून घेत असताना तो व्यापाराला गोळी झाडण्याची धमकी देतो. शेवटी तो बॅग हिसकावून पळ काढण्यात यशस्वी होतो. व्यापारी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो, मात्र याचा काहीच फायदा होत नाही, कारण चोर ८० लाख रुपये घेऊन पळून गेलेला असतो.

सीसीटीव्हीचा व्हिडिओ व्हायरल

ही घटना घडताच व्यापाऱ्याने पोलिस स्थानकात धाव घेतली. त्याने दरोडेखोराविरोधात तक्रार नोंदवली. या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे. आता पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांमध्ये इतकी मोठी रक्कम चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये बंदुकीचं धाक दाखवून ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा घातल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT