Delhi Crimr News Saam TV
देश विदेश

Delhi Crime News : दिल्लीत पुन्हा श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना; ढाब्यावरील फ्रीजमध्ये तरुणीचा मृतदेह

श्रद्धासारखच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीत समोर आलं आहे.

Shivani Tichkule

Delhi Crime News : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता श्रद्धासारखच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीत समोर आलं आहे. पोलिसांना मुलीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कश्मिरे गेट ISBT जवळ एका कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपीने (Accused) मृतदेह मित्राळ गावातील ढाब्याच्या फ्रीझरमध्ये लपवून ठेवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोत असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मुलाची चौकशी सुरू आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी फ्रीजमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे असून आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

श्रद्धा हत्याकांड प्रकरण

दरम्यान, यापूर्वी दिल्लीतील (Delhi) श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने गेल्या वर्षी १८ मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले.

मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता. यामध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. इतकंच नाही तर श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता, एवढेच नाही तर त्याच्या इतर मैत्रिणीही त्याला भेटायला या फ्लॅटमध्ये येत होत्या.

आफताबला पोलिसांनी १२ नोव्हेंबरला अटक केली होती. पॉलीग्राफी टेस्ट आणि नार्कोमध्येही आफताबने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. एवढेच नाही तर श्रद्धाच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक मुलींशी संबंध असल्याचेही आफताबने कबूल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकर बिझनेसमन होणार विराट कोहलीच्या RCBचा मालक, तब्बल १७५५३ कोटींच्या डीलची चर्चा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT