Pandharpur Mhaswad Highway : उपरी पूलाला तडे; माेठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ?

दीड वर्षांनंतरही या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Pandharpur, Mhaswad, Road
Pandharpur, Mhaswad, Roadsaam tv

Pandharpur : पंढरपूर (Pandharpur) ते म्हसवड (Mhaswad) या 60 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. या मार्गावरील उपरी येथील पूलाला तडे गेल्याने पूल (Bridge) धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे (Road) काम पूर्ण होण्यापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मागील दीड वर्षीपूर्वी त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

Pandharpur, Mhaswad, Road
Pandharpur : नीरा देवघरचा प्रकल्प शरद पवारांमुळेच रखडला, त्यांनीच पाणी पळवले : गजेंद्र सिंह शेखावत

पंढरपूर तीर्थक्षेत्राला जोडणा-या सर्व मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. इतर महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पंढरपूर ते म्हसवड या महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे.

गेल्या वर्षभरापासून तर काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी अपघात (accident) झाले आहेत. या मार्गावरील उपरी गावा जवळच्या कासाळ ओढ्यावरील सर्वात मोठ्या पूलाचे काम देखील रखडले आहे.

Pandharpur, Mhaswad, Road
Pune Bangalore National Highway : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडणार; जाणून घ्या वाहतुक मार्गातील बदल

येथील जून्या पूलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. पूलाचे कठडे तुटून पडले आहेत. तर पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पुलाचे दगडी खांब देखील पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत. अशा धोकादायक पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशी व माल वाहतूक सुरू आहे. (Maharashtra News)

येथील पूलाचे व रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार तक्रारी करून ही महामंडळाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे काम सुरू असतानाच मागील दीड वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. दीड वर्षांनंतरही या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com