Delhi Navy Officer Murder Saam Tv
देश विदेश

Shocking : सासूचा ५ महिन्यांपूर्वी मृत्यू, नवरा राहायला परराज्यात; रिटायर नेव्ही अधिकाऱ्याची सूनेनं केली हत्या, त्या दिवशी भयंकर घडलं

Delhi Navy Officer Murder News : दिल्लीत सुनेने संपत्तीच्या लालचेपोटी स्वतःच्या सासऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. मृत व्यक्ती ही निवृत्त हवाई दल अधिकारी असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीत बिंदापूर परिसरात संपत्तीच्या वादातून भयानक हत्या

  • निवृत्त हवाई दल अधिकारीची हत्या

  • अधिकाऱ्याच्या सुनेनेच केली हत्या

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवला

एखाद्या गोष्टीची अतिप्रमाणात हाव असणं धोकादायक ठरू शकतं. पैसे, संपत्ती यापुढे कत्येक जणांना अनेकदा नात्यांचा देखील विसर पडतो. अशाच प्रकारची मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना दिल्लीतून समोर आली आहे. एका महिलेने संपत्तीसाठी तिच्या सासऱ्यांवर हल्ला करून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव नरेश कुमार असून ते निवृत्त भारतीय हवाई दलाचे अधिकारी होते. तर आरोपी महिलेचं नाव गीता कुमार असे आहे. सदर घटना दिल्लीतील बिंदापूर भागात घडली आहे. दिल्ली पोलिसांना २७ डिसेंबर रोजी सकाळी १०:४६ वाजता बिंदापूरच्या मानस राम पार्क परिसरात एका पुरूषाच्या हत्येची तक्रार करणारा पीसीआर कॉल आला. माहिती मिळताच, स्थानिक पोलिस ठाण्यातील एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घालून तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनाही परिस्थिती संशयास्पद वाटली. पोलिसांना नरेश कुमार त्यांच्या घराच्या छतावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने हल्ल्याचा संशय निर्माण झाला.

नरेश कुमार यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत नरेशचा मुलगा प्रवीण याची पत्नी गीता हिने पोलिसांना सांगितले की तिच्या सासऱ्यांवर हल्ला झाला आहे. पण जेव्हा पोलिसांनी मृताची सून गीता हिची चौकशी केली तेव्हा त्यांना तिच्या जबाबात विरोधाभास आढळला. त्यानंतर गीताची पुन्हा चौकशी सुरू केली. गीता भारावून गेली आणि तिने जे घडलं ते खरं खरं कबूल केलं.

गीताने पोलिसांना सांगितले की, तिच्यामध्ये आणि तिच्या सासऱ्यांमध्ये वारंवार संपत्ती वरून कडाक्याचे वाद व्हायचे. हे वाद एकदिवशीचे नसून दररोज होऊ लागले. हत्येच्या दिवशी या वादाने टोक गाठले. सासरा ऐकत नव्हता म्हणून संतापलेल्या गीताने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. नरेश कुमार यांच्या पत्नीचे ऑगस्टमध्ये निधन झाले होते. गीताचा पती परवीन हैदराबादमध्ये काम करतो आणि घटना घडली तेव्हा ते तिकडेच कमानिमित्त होते . या घटनेनेनंतर पोलिसांनी गीताला ताब्यात घेऊन हत्ये अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील अनेक शाळांना आज सुट्टी

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?

SIP Calculator: दररोज फक्त १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी मिळवा; SIPचं कॅल्क्युलेशन वाचा

First step if phone hacked: तुमचा फोन हॅक झाला तर पहिली गोष्ट कोणती करावी? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! मंत्री आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT