देश विदेश

Shocking: मित्रानेच काढला मित्राचा काटा, पार्टीसाठी घराबाहेर बोलवलं अन् चाकूने सपासप केले ९० वार

Delhi Crime News: दिल्लीतील किशनगडमध्ये २३ वर्षीय नितीश खत्री याची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केली. वादातून सुड घ्यायला आरोपींनी त्याला पार्कमध्ये नेऊन ९० हून अधिक वेळा चाकूने वार केले.

Dhanshri Shintre

दिल्लीतील किशनगड परिसरात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. या एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मछली पार्क येथे २३ वर्षीय नितीश खत्री या तरुणावर त्याच्याच दोन मित्रांनी ९० पेक्षा अधिक वेळा चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

आरोपींनी वार केल्यानंतर नितीशचा गळाही चिरला, ज्यामुळे त्याला वाचवण्याची कोणतीही शक्यता उरली नाही. ही हत्या केवळ सूड घ्यायचा म्हणून केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी पार्टीचे आमिष दाखवून नितीशला घराबाहेर बोलावले आणि मछली पार्कमध्ये त्याच्यावर हल्ला केला.

या प्रकरणात किशनगड पोलिसांनी मोहित महालवत उर्फ मन्नू आणि लकी उर्फ तन्नू या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी वापरलेला चाकू, मृताचा मोबाईल फोन आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. तपासात उघड झाले आहे की नितीश आणि आरोपी दोघेही जुने मित्र होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात गंभीर वाद झाला होता. या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून आरोपींनी सूड उगवण्यासाठी हा कट रचला.

रविवारी रात्री आरोपी मोहित आणि लकी हे वाद मिटवण्याच्या बहाण्याने नितीशच्या घरी गेले. त्यानंतर तिघेही मिळून पार्कमध्ये जाऊन दारू पिण्यासाठी बसले. दरम्यान पुन्हा वाद उफाळला आणि रागाच्या भरात आरोपींनी नितीशवर सलग चाकूचे वार सुरू केले. त्यांनी त्याच्या शरीरावर ९० हून अधिक वेळा चाकू खुपसले आणि शेवटी त्याचा गळा चिरला. दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना संपूर्ण पार्कमध्ये रक्त पसरलेले दिसले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

किशनगड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर नितीशचा मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. वकील दीपक त्यागी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून हत्या पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. या घटनेनंतर किशनगड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT