Congress Leader Death  saam tv
देश विदेश

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Death of Congress Leader : काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

Yash Shirke

  • काँग्रेस नेते लखपत सिंह कटारिया यांची दिवसाढवळ्या गोळीबार करून हत्या झाली.

  • ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

  • उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला; पोलिसांनी दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Congress : राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील बेगमपूर भागात काँग्रेस नेते लखपत सिंह कटारिया यांच्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी कटारिया यांच्यावर गोळ्या झाडल्या. आसपासच्या लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ सप्टेंबर) लखपत सिंह कटारिया हे मॉर्निंग वॉकसाठी घराच्या बाहेर पडले होते. वॉकदरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

दिल्ली पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने घटनेची माहिती दिली. मालवीय नगर पोलीस ठाण्यात सकाळी ९.५३ वाजता पीसीआर कॉल आला. दुचाकीवरुन येणाऱ्या दोघांनी कोणावर तरी गोळीबार केला आहे, असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. विजय मंडल पार्कजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लखपत सिंह कटारिया यांना थांबवले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळ्या झाडल्यानंतर ते दोघे घटनास्थळावरुन पळून गेले, अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.

लखपत सिंह कटारिया (वय ५५ वर्षे) हे दिल्लीतील बेगमपूर भागात राहतात. ते प्रॉपर्टी डीलर आहेत, याशिवाय ते राजकारणामध्येही सक्रीय आहेत. लखपत कटारिया हे काँग्रेस समितीचे सदस्य होते. मॉर्निंग वॉकला जाताना सकाळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या जीवघेण्या हल्ल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या कटारिया यांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला लहान मुलांनसोबत घ्या पतंग उडविण्याचा आनंद

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT