Arvind Kejriwal Saam TV
देश विदेश

Arvind Kejriwal ED Custody : ब्रेकिंग! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 7 दिवसांची ईडी कोठडी

Arvind Kejriwal ED Custody News : दिल्लीतील कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ७ दिवसांची कोठडी मिळाली आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.

Pramod Subhash Jagtap

Arvind Kejriwal ED custody Update :

दिल्लीतील कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ७ दिवसांची ईडी कोठडी मिळाली आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. ईडीने १० दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, केजरीवाल यांना ७ दिवसांची ईडी कोठडी मिळाली. (Latest marathi News)

कथित मद्य घोटाळाप्रकरणी कोर्टात अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून युक्तिवाद करण्यात येत होता. ईडीकडून कोर्टात अरविंद केजरीवाल हे संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यातील पैशांचा वापर गोव्यातील निवडणुकीत केल्याचाही आरोप ईडीने केला. ईडीकडून मद्य घोटाळ्याच्या धोरणासाठी दक्षिणेतील लोकांनी शिरकाव केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

विजय नायर यांच्या नावाचा उल्लेख

ईडीने कोर्टात विजय नायर यांच्या नावाचीही उल्लेख केला. ईडीने म्हटलं की, संपूर्ण घोटाळ्यात विजय नायर यांनी मध्यस्थीची भूमिका निभावल्याचा आरोप केला. तर के कविता यांनी अरविंद केजरीवाल यांना ३०० कोटी रुपयांची ऑफर केल्याचा आरोप ईडीने केला. ईडीला केजरीवाल यांना १० दिवसांची कोठडी हवी होती. मात्र, ईडीला ७ दिवसांची ईडीला कोठडी मिळाली.

ईडीने १० दिवसांची कोठडीची मागणी करत अरविंद केजरीवाल हे कथित घोटाळ्यात सामील झाल्याचा आरोप केला आहे. तसेच हे प्रकरण फक्त १०० कोटी रुपयांच्या लाचेचं नसून या प्रकरणात आरोपींना ६०० कोटींहून अधिक फायदा झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.

ईडीने दिला २ चॅटचा पुरावा

ईडीने कोर्टात दोन जणांच्या चॅटिंगचा पुरावा सादर केला. या चॅटमध्ये एकाने म्हटलं की, व्यवहार हा रोख स्वरुपात होईल. दुसऱ्याचं म्हणणं आहे की, फक्त व्यवहाराचा एकच भाग रोख स्वरुपात होईल. या प्रकरणात वेगवेगळ्या लोकांनी रोख स्वरुपात व्यवहार केला आहे. ईडीने म्हटलं की, या प्रकरणातील जुने इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT