Delhi CM Arvind Kejriwal Saam Digital
देश विदेश

Delhi CM Arvind Kejriwal : मोठी बातमी! दिल्लीतील आपचं मुख्यालय केलं 'सील'; 'लेव्हल प्लेइंग फील्ड'चं उल्लंघन असल्याचा मंत्री आतिशी यांचा आरोप

Delhi Liquor Policy Case : मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून चौकशीसाठी ६ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचं कार्यालय सील करण्यात आल्याचा आरोप आप मंत्री आतिशी आतिशी मारलेना यांनी केला आहे.

Sandeep Gawade

Delhi CM Arvind Kejriwal

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून चौकशीसाठी ६ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. ईडीने मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीलाच मुख्य सूत्राधार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचं कार्यालय सील करण्यात आल्याचा आरोप आप मंत्री आतिशी आतिशी मारलेना यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी पक्ष कार्यालक का सील करण्यात आले ? असा सवाल करत त्यांनी याप्रकणी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे.

आतिशी मारलेना यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील आम आपमी पक्षाचं कार्यालय चारी बाजूंनी सील करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात प्रेवश कसा काय बंद केला जाऊ शकतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच 'लेव्हल प्लेइंग फील्ड'च्या आश्वासनांचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हलटं आहे. भारतीय संविधानाच्या विरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सौरभ भारद्वाज यांनीही हे प्रकरण आम्ही निवडणूक आयोगात घेऊन जाणार असल्याचं म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली आहे. अटकेनंतर आज (२२, मार्च) अरविंद केजरीवाल यांना राऊज इव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणाची सुनावणी कोर्टात पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा आजचा मुक्काम कोठडीतच असण्याची शक्यता आहे.

ईडीकडून जोरदार युक्तीवाद..

यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची माहिती नातेवाईकांना दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. असे सांगत अटकेसंदर्भात २८ पानांची कागदे ईडीकडून न्यायालयाला सुपुर्त करण्यात आली. तसेच या सगळ्या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार अरविंद केजरीवाल आहेत. या घोटाळ्यातून झालेल्या पैशाचा वापर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी केला गेला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला.

केजरीवाल हेच मुख्य आरोपी.. ईडीचा दावा

तसेच "याच प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना जामीन मिळालेला नाही. ही सगळी पॉलिसी बनवनण्यात केजरीवाल यांचा हात असून विजय नायर हा केजरीवाल यांच्यासाठी काम करत होता," असा मोठा आरोपही ईडीकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT