Delhi CM Residence  
देश विदेश

Delhi Politics: PWD कडून मुख्यमंत्री आवास सील; सीएम आतिशी यांच्या वस्तू काढल्या घराबाहेर , काय आहे प्रकरण

Delhi CM Residence : भाजपला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ताब्यात घ्यायचे आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील करण्यात आले आहे, असा मोठा आरोप आम आदमी पक्षाने केलाय.

Bharat Jadhav

दिल्लीमधील राजकारणात पुन्हा एकदा राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा वाद रंगलाय. दिल्लीच्या पीडब्ल्यूडी विभागाने दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचे निवासस्थान रिकामे केले आहे. विशेष म्हणजे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने थेट मुख्यमंत्र्यांचे सामान बाहेर काढलंय. उपराज्यपालांच्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीएम आतिशी यांचे सर्व सामान बाहेर काढल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केलाय.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं होत असून एखाद्या मुख्यमंत्री निवासस्थान खाली करण्यात आले असेल. भाजपच्या इशाराने राज्यपाल यांनी आदेश देत मुख्यमंत्री अतिशी यांचे सामान मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले आहे. इतकेच नाही तर भाजपच्या एका मोठ्या नेत्याला मुख्यमंत्री निवासस्थान देण्यात येणार असल्याने ही कारवाई करण्यात आलीय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय.

अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे केल्यावर शीशमहलबाबतचा ताजा मुद्दा समोर आला. यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांना या बंगल्यात स्थलांतरित व्हावे लागले. मात्र आतिशी अद्याप या बंगल्यात शिफ्ट झालेली नाही. हे लोक मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप आम आदमी पक्षाने भाजपवर केला. 27 वर्षांपासून दिल्लीत वनवास भोगलेल्या भाजपला आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ताब्यात घ्यायचंय असा आरोप आपकडून करण्यात आलाय.

दरम्यान मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान अरविंद केजरीवाल यांनी खाली केले आहे. पण भाजपच्या दबावाखाली अधिकारी प्रोटोकॉलचे उल्लंघन करत फ्लॅगस्टाफ ६, रोड येथील बंगला दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांना देत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केलाय. दरम्यान मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे बंगल्यात राहत असल्याचा आरोप दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी केला होता. हा बंगला सील करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.

मुख्यमंत्री आतिशी सोमवारी उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या बंगल्यात सामानासह राहायला आल्या होत्या. केजरीवाल यांनी नऊ वर्षे या बंगल्यात वास्तव्य केलंय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तो रिकामा केलाय.

आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना बंगला अद्याप देण्यात आलेला नसल्याचा आरोप करत भाजपने बंगला बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. बंगल्याच्या परिसरात विद्यमान मुख्यमंत्र्यांचे कॅम्प ऑफिसही रिकामे करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT