CJP नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीचे नियोजन
कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क परिसरात आंदोलन
सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयीन कोठडी सुनावले
रॅलीपूर्वी अभिजित दिपके यांच्या निवासस्थानाभोवती दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त
दिल्लीत सीजेपीच्या प्रमुख नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज राजधानी दिल्लीत ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क परिसरात ही रॅली काढण्याचे नियोजन असून या रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. रॅली सुरु होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके राहत असलेल्या दिल्लीतील घराला घेराव घातला असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान दीपकेंना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अलीकडेच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर-मंतर येथे तिरंगा फडकवल्याच्या घटनेनंतर त्यांच्यावर नियमभंगाचे आरोप ठेवण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ते सध्या तिहार कारागृहात आहेत. या कारवाईविरोधात CJP ने रस्त्यावर उतरून निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते हातात राष्ट्रध्वज घेऊन आपला विरोध व्यक्त करणार आहेत. दरम्यान, रॅली सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अटक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, सेंट्रल पार्क परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली महानगरपालिकेने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आंदोलनाच्या नियोजनावर आणि कार्यकर्त्यांच्या एकत्र येण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादण्यास नकार दिल्याचे सांगितले जात असले, तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस सतर्क आहेत.
कनॉट प्लेस हा राजधानीतील महत्त्वाचा व्यावसायिक आणि सार्वजनिक परिसर असून, संसद भवनाच्या जवळच्या भागातील सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. या पार्श्वभूमीवर रॅलीला किती प्रतिसाद मिळतो, पोलिसांची भूमिका काय राहते आणि आंदोलन नियोजित वेळेनुसार सुरू होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.