Delhi Accident News
Delhi Accident News saam tv
देश विदेश

Delhi Accident News: दिल्लीत भीषण अपघात! ४ स्कूल बस एकमेकांना धडकल्या, काही विद्यार्थी जखमी

साम टिव्ही ब्युरो

Delhi News : दिल्ली राजधानीतून सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाजवळ शाळेच्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४ स्कूल बस एकमेकांना धडकल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाजवळ एका वाहनाची आणि एका रिक्षाचा अपघात झाला. त्यानंतर ४ स्कूल बस एकमेकांना धडकल्या. या भीषण अपघातात (Accident) अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, भीषण अपघातानंतर स्कूल बसच्या (Bus) खिडकीतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दुर्घटनेनंतर परिसरात एकच गर्दी झाली. अपघातानंतर उपस्थित लोक जखमींच्या मदतीला धावले. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलीस अधिकारी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले. अद्याप जखमी विद्यार्थ्यांबाबत आणखी माहिती मिळाली नाही.

दरम्यान, याआधी ८ जानेवारी रोजी रात्री झालेल्या दिल्लीत दोन अपघाताच्या दुर्घटना घडल्या. तर १७ जानेवारी रोजी झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. तर दिल्लीच्या मधू विहार येथे झालेल्या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT