Uttar Pradesh Accident : धक्कादायक! नवी नवरी अंघोळीला गेली; पतीने दरवाजा तोडला तेव्हा समोर आलं हृदय हेलावणारं सत्य

Uttar Pradesh : लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीचं निधन झाल्याने पतीला मोठा धक्का बसला आहे.
bride
bride Saam TV
Published On: 

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेश येथून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. लग्न करुन घरी आलेल्या नव्या नवरीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीचं निधन झाल्याने पतीला मोठा धक्का बसला आहे. (Latest Uttar Pradesh News)

मेरठमध्ये २६ जानेवारीला त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर वाजत गाजत वरात नवरीला घेऊन घरी आली. यावेळी पुढे काही विपरीत घडणार आहे याची कुणालाही काहीच कल्पना नव्हती. नव्या नवरीच्या येण्याने घरात आनंदी आनंद होता.

घरी आल्यावर रात्री इतर पुजेसाठी नवरी तयारी करत होती. यावेळी ती अंघोळीला गेली तेव्हा तिथे असलेल्या गिजरचा शॉटसर्कीट झाला. याने नव विवाहीतेचा मृत्यू झाला. बराच वेळ झाला पत्नी बाहेर आली नाही म्हणून पती तिला आवाज देऊ लागला.

bride
Uttar Pradesh : रीलचा नाद जीवावर बेतला; भरधाव ट्रेनच्या धडकेत तरुणीसह तिघांनी गमावला जीव

बाथरुममध्ये पडली होती पत्नी

मात्र तिच्याकडून काहीच उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे तो खूप घाबरला. त्याने दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडून तो आतमध्ये गेला तेव्हा बाथरुममध्ये खूप धूर झाला होता आणि त्याची पत्नी जमिनीवर खाली पडली होती.

bride
Uttar Pradesh : पोटदुखीनं त्रस्त महिला रुग्णालयात पोहोचली; ऑपरेशन करणारे डॉक्टरही हादरले

पत्नीला अशा अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात सर्वांना ही गोष्ट समजली तेव्हा तात्काळ नवरीला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला तपासले तेव्हा ती मृत असल्याचं त्यांनी घोषित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com