Building Collapse Saam Tv
देश विदेश

Building Collapse: दिल्लीत ३ मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

Delhi Building Collapse: दिल्लीमध्ये ३ मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत २ जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला.

Priya More
  • दिल्लीच्या चावडी बाजार परिसरात तीन मजली इमारत कोसळली

  • दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले आहे

  • चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळ इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाला

दिल्लीच्या चावडी बाजार परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली. चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळील सितारा गलीमध्ये सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याठिकाणी ३ मजली निर्माणाधीन इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये गुरुवारी सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास चावडी बाजारमध्ये इमारत कोसळली. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखालून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता आहे.

अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेश शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ६ जणांना बाहेर काढले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम सुरू असल्याने तिथे मजूर काम करत होते. तर इतर लोक जवळच उपस्थित होते. ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून अनेक पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

चावडी बाजारातील अरुंद आणि दाट लोकवस्तीच्या रस्त्यांमुळे बचाव पथकांना घटनास्थळी अवजड यंत्रसामग्री आणि वाहने पोहोचवण्यात अडचण येत आहे. अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. ढिगारा हटवण्यासाठी क्रेन आणि स्थानिक रहिवाशांची मदत घेतली जात आहे. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी बचाव पथक काळजीपूर्वक ढिगारा बाजूला करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: देवदर्शनापूर्वीच भाविकांवर काळाचा घाला, अनियंत्रित कार नदीत कोसळली; चौघांचा मृत्यू

Gold Rate Today: वसुबारसेलाच ग्राहकांना मोठा झटका! २४ तासांत सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

Maharashtra News Live Update: जळगावमध्ये 240 किलोंचा डुप्लिकेट खवा एफडीएने केला जप्त

Aadhaar Update : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे झाले आता अत्यंत सोपे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Satej Patil: वोट चोरीनंतर आता सत्ता चोरीचा प्रयत्न; गोकुळच्या वादावरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT