आजकाल प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत गरजेचे असते. पूर्वी आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आधार सेवा केंद्राच्या किंवा कार्यालयांच्या फेऱ्या फेऱ्या माराव्या लागतात. तसेच अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागायची. मात्र आता नागरिकांची ही मोठी कटकट दूर झाली आहे. आता तुम्ही घरबसल्या कोणत्याही कागदपत्राशिवाय अगदी सहजपणे आपल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
या सोप्या प्रक्रियेमुळे लोकांना रांगेत उभे राहण्यापासून किंवा कार्यालयांच्या फेऱ्या करण्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्हालाही तुमच्या आधार कार्डशी नवीन मोबाईल नंबर जोडायचा असेल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम करू शकता
सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये संबंधित आधार सेवा ॲप पिन दर्ज ॲप उघडा.
ॲप उघडल्यानंतर तुम्हाला त्याच्या होम पेजवर 'सर्व्हिसेस' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
सर्व्हिसेसच्या पर्यायामध्ये तुम्हाला 'माय आधार' हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर स्क्रीनवर काही महत्त्वाचे निर्देश दिसतील. ते सर्व निर्देश काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या 'कंटिन्यू' या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या समोर दोन वेगवेगळे सेक्शन किंवा पर्याय येतील. पहिल्या पर्यायामध्ये तुमचा सध्याचा जुना मोबाईल नंबर दिसेल. तर दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला जो नवीन नंबर आधार कार्डशी लिंक करायचा आहे, तो तिथे अचूक टाकावा लागेल.
नंबर टाकल्यानंतर तुमच्या त्या नवीन मोबाईल नंबरवर एक वन-टाइम पासवर्ड म्हणजेच OTP येईल. तो ओटीपी योग्य जागेवर प्रविष्ट करा.
ओटीपी टाकल्यानंतर तुमची 'फेस ऑथेंटिकेशन' म्हणजेच चेहऱ्याद्वारे ओळख पटवण्याची प्रक्रिया पार पडेल. यासाठी तुम्हाला कॅमेरा चालू करून तुमचा चेहरा दाखवावा लागेल. याद्वारे तुमची पडताळणी पूर्ण होईल आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर आधार कार्डशी यशस्वीरीत्या लिंक होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.