Delhi Building Collapse 
देश विदेश

राजधानी हादरली! निर्माणाधीन इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच

दिल्लीतील चावडी बाजार परिसरातील गली शीश महल येथे तीन मजली निर्माणाधीन इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बचावकार्यात मलब्यातून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Namdeo Kumbhar

राजधान दिल्लीतील गजबजलेल्या चावडी बाजार परिसरातील 'गली शीश महल' येथे ३ मजली निर्माणाधीन इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. रविवारी सकाळी मलब्यातून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आल्यामुळे या दुर्घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. ममागील ३ दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गुरुवारी सकाळी ९:४८ च्या सुमारास चावडी बाजारमधील एक तीन मजिला निर्माणाधीन इमारत अचानक कोसळले. या इमारतीचे काम सुरू असताना अनेक मजूर व कामगार तिथे उपस्थित होते. अचानक इमारत पत्त्याच्या पत्त्यासारखी खाली बसल्याने सगळे कामगार मलब्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, एनडीआरएफ (NDRF) आणि महानगरपालिकेच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

मृतांचा आकडा वाढला, अजूनही शोध सुरू:

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. रविवारच्या सुमारास मलब्यातून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याची ओळख लुच्चुमन मुखिया (वय ६६, रा. दरभंगा, बिहार) अशी पटली आहे. याआधीही शनिवार आणि शुक्रवारी ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान, अजूनही मलब्याखाली काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांची कारवाई:

घटनास्थळापर्यंत जाणाऱ्या गल्ल्या अतिशय लहान असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. ट्रॅक्टर किंवा मोठ्या गाड्या जाऊ शकत नसल्यामुळे मलब्याला लहान उपकरणांच्या साहाय्याने बाजूला केले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलत तीन ठेकेदारांना फरीदाबाद येथून अटक केली. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला धमकी देणारा आरोपी अटकेत

Walking After Dinner: जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ७ भन्नाट फायदे, जाणून घ्या

असला नवरा नको गं बाई हे दूरच, महिला म्हणतात लग्नच नको; जाणून घ्या धक्कादायक आणि रंजक कारणं

Liver damage from drinking: किती वर्ष दारू प्यायल्याने लिव्हर खराब होतं? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!

Sanjay Raut : ५ हजारांची मदत पुरेशी आहे का? फडणवीसांच्या दिवाळी सेलिब्रेशनवर राऊतांचा थेट हल्लाबोल

SCROLL FOR NEXT