IAS Pooja Khedkar Saam Digital
देश विदेश

Pooja Khedkar News: पूजा खेडकरच्या जामीनावर आज फैसला! दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी; अटकेचे संरक्षण संपल्याने कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Pooja Khedkar Latest News: आज कोर्ट नेमकं काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत कालच पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात रिजॅाईंडर दाखल केले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २९ ऑगस्ट २०२४

पुण्यामधील वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाचा फैसला आज होणार आहे. पूजा खेडकर यांच्या अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी पूजा खेडकर यांना कोर्टाने दोन वेळा अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला होता. त्यामुळे आज कोर्ट नेमकं काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत कालच पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात रिजॅाईंडर दाखल केले आहे.

या रिजॉईंडरमध्ये पूजा खेडकरने युपीएससीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. UPSC च्या आरोपात तथ्य नसल्याचे पूजा खेडकर यांचे म्हणणे आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप UPSCने केला होता. मात्र नाव बदलल्याची माहिती यापूर्वीच UPSCकडे दिली असल्याचे पूजा खेडकरने रिजॅाईंडरमधे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांचा या प्रकरणात एकटीच हात आहे की यात आणखी कोण कोण सहभागी आहे हे शोधण्यासाठी पूजाला अटक करण्यात यावं अशी मागणी UPSC कडून प्रतिज्ञापत्रात केली गेली आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीनंतर पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की तो फेटाळला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

Mumbai Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धमकीचा कॉल; रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकू!

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

SCROLL FOR NEXT