एनआयएनं दहशतवादी उमरचा आणखी एक साथीदार जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश अटक केली आहे.
श्रीनगरमधून दानिशला अटक करण्यात आलीय.
दहशतवादी दानिश हमाससारखा हल्ला करण्याचा कट आखत होता.
दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएला एक मोठे यश मिळालंय. एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक करण्यात आलीय. दानिश हा जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी आहे. त्याने दहशतवादी उमर उन नबीसोबत हल्ला करण्याचा कट रचला होता. दरम्यान एनआयएचे पथक जसीर बिलाल वाणीसह दिल्लीत पोहोचलंय. उद्या त्याला पटियाला हाऊसच्या स्पेशल एनआयए कोर्टात हजर केलं जाणार आहे.
जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याच्या चौकशीतून एक महत्त्वाचा खुलासा झालाय. वृत्तानुसार दानिश हमासच्या ड्रोन आणि छोटे रॉकेट बनवून भारतात मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता. दानिश ड्रोनचा शस्त्र म्हणून वापर करत होता. एनआयएच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. दानिश ड्रोन तयार करण्याचा प्रयत्न करत होता. हे ड्रोन शस्त्र म्हणून वापरता येतील असे आधुनिक ड्रोन तो तयार करत होता.
दानिश हा अशाच प्रकारचे ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ आहे. तपास यंत्रणेने त्याच्याकडील ड्रोन जप्त केली आहेत. ड्रोनमध्ये कॅमेरा, बॅटरी आणि एक छोटा बॉम्ब लावण्यात आला होता, परंतु तपास यंत्रण वेळेआधीच त्याला अटक केलीय. गर्दीच्या ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा डाव दहशतवाद्यांचा होता. सीरिया, गाझा आणि अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारचे हल्ले करण्यात आलेत. ही पद्धत हमासची आहे, हमास अशाच प्रकार ड्रोन हल्ले घडवून आणत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.