Delhi Blast Accused Umar Nabi Video Saam Tv
देश विदेश

Delhi Blast: 'इस्लाम में सुसाइड हराम पर बॉम्बिंग...', दिल्ली स्फोटापूर्वीचा दहशतवादी उमरचा VIDEO समोर

Delhi Blast Accused Umar Nabi Video: दिल्ली स्फोटाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा स्फोट घडवून आणणारा आरोपी डॉ. उमर नबीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो स्फोटापूर्वी माहिती देताना दिसत आहे.

Priya More

Summary -

  • दिल्ली स्फोटाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे

  • स्फोटापूर्वीचा आरोपी उमर नबीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

  • आरोपी उमर या व्हिडीओत आत्मघाती हल्ल्याबाबत बोलताना दिसला

  • हा व्हिडीओ उमरने दिल्ली स्फोटापूर्वी तयार केला होता

दिल्ली स्फोटातील कथित सुसाइड बॉम्बर डॉ. उमर नबीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये उमर सुसाइड बॉम्बबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्फोटाच्या काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड केलेला होता अशी माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांनी सांगितले की, या व्हिडीओमध्ये उमर त्यांचा प्लान नेमका काय आहे हे सांगताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये उमर म्हणतो की, इस्लाममध्ये सुसाइड निषिद्ध आहे पण बॉम्बस्फोटांना परवानगी आहे. आत्मघाती हल्ल्यांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती असा विश्वास करतो की तो एका विशिष्ट वेळी आणि विशिष्ट ठिकाणी मरणार आहे. तेव्हा तो एका धोकादायक मानसिकतेमध्ये जातो. तो स्वत:ला अशा स्थितीमध्ये ठेवतो जिथे त्याला वाटते की मृत्यू हेच त्याचे एकमेव गंतव्यस्थान आहे.

या व्हिडीओमध्ये उमर पुढे म्हणतो की, पण वास्तविकता अशी आहे की असा विचार किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही. कारण ते जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांच्या विरुद्ध जाते.' दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट झाला होता. कारमधून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटामध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृ्त्यू झाला आहे. या स्फोटामध्ये सुरूवातीला १२ जणांचा मृत्यू झाला होता. पण उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला. स्फोटामध्ये जखमी असलेल्या इतरांवर उपचार सुरू आहेत. या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

अल फलाह विद्यापीठाशी संबंधित व्हाईट कॉलर दहशतवाद आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीने चार राज्यांमधील ३० ठिकाणी छापे टाकले आहे. अल फलाह विद्यापीठाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबाद, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये शोधमोहीम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar Trailer: अ‍ॅक्शन अवतारात दिसणार बॉलिवूडचे 'धुरंधर'; अंगावर काटा येणारा ट्रेलर, डायलॉग ऐकून कराल कौतुक

Belly Fat Reduce Tips: रोज जिम करून वजन कमी होत नाही, हे घरगुती उपाय करा, पोटाची ढेरी लगेच होईल कमी

Ajit Pawar: फोडलेले नारळ, हळद-कंकू अन् लिंबू...; बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा

Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Kitchen Cleaning Hacks : खराब झालेले लाकडी पोळपाट कसे कराल साफ ? या टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT