दिल्लीतील भीषण स्फोटानं देशाला हादरवून टाकलं आणि पदार्फाश झाला...व्हाईट कॉलर मॉड्य़ूलचा.. जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदच्या दहशतवादी नेटवर्कचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी फरीदाबादमध्ये सापळा रचला.. डॉ. मुजम्मिलला ताब्यात घेतलं... आणि संध्याकाळी झालेल्या दिल्लीतील स्फोटानं 5 व्हाईट कॉलर डॉक्टर्सचे काळे कारनामे समोर आले....हे व्हाईट कॉलर्स डॉक्टर दहशतवादी कारवायांमध्ये कसे गुंतले होतो
5 डॉक्टरांचं दिल्ली स्फोटाचं कनेक्शन
डॉ. उमर मोहम्मद
स्फोटातील कार पुलवामातील डॉ. उमरच्या नावावर
स्फोटावेळी उमर कारमध्येच
दिल्लीतील स्फोटाचा मास्टरमाईंड
डॉ. आदिल अहमद
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अनंतनागमध्ये डॉ. आदिलला अटक
आदिल अहमद मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर
आदिलच्या लॉकरमधून सापडली AK-47 रायफल
आदिलचा जैश आणि अंसार गजवात-उल-हिंदशी संबंध
डॉ. अहमद मोहिउद्दीन
गुजरात ATSकडून 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉ. मोहिउद्दीनला अटक
डॉ. मोहिउद्दीनचं चीनमध्ये शिक्षण
'रिसिन' नावाचं विषारी रसायन तयार करत होता
दिल्लीत आझादपूर मंडी, अहमदाबादेत नरोडा फ्रूट मार्केट, लखनऊत RSS कार्यालयाची रेकी
डॉ. शाहीन शाहिद
दिल्ली स्फोटाशी संबंध असलेल्या डॉ. शाहीनला फरिदाबादमधून अटक
भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहीनावर जबाबदारी
डॉ. मुजम्मील शकील
10 नोव्हेंबरला फरिदाबादमधून काश्मीरच्या डॉ. मुजम्मील शकीलला अटक
अल-फलाह विद्यापीठात प्राध्यापक
शकीलकडून 360 किलो स्फोटकं जप्त
शकीलचा जैशशी संबंध
दरम्यान व्हाईट कॉलर डॉक्टरांच्या या नेटवर्कमध्ये लखनऊच्या डॉ. परवेज अन्सारीचाही समावेश असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे... त्यामुळे दिल्ली स्फोटानंतर परवेजला ताब्यात पोलिसांनी त्याच्या घरावर छापेमारी केली.. मात्र त्याआधीच डॉ. परवेज गायब झालाय.. त्यामुळे दहशतवादी आता पांढऱ्या कोटाच्या आडून नापाक कारवाया आखतायत...सुशिक्षित उच्चभ्रू वर्गही आता दहशतवादी कारवायांमध्ये सामील होत असल्यानं दहशतवादाचा हा बदलता चेहरा केवळ भारतीय तपास यंत्रणांपुढेच नव्हे तर जगासाठी मोठं आव्हानं उभं करतोय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.