अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी यांना अटक करण्यात आलीय.
पीएमएलए अंतर्गत जवाद सिद्दीकी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय.
अल फलाह ग्रुपच्या जागांवर छापे टाकण्यात आले. तेथून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक करण्यात आलीय. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय. सिद्दीकी यांना आज १८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. अल फलाह ग्रुपच्या मालकीच्या जागेवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर अजून तपास करण्यात आलाय. त्यात पुरावे सापडल्यानंतर जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक करण्यात आलंय.
सिद्धीकी यांनी पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी आणि लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यासाठी करण्यात आलाय. जवाद अहमद सिद्दीकी यांनी केलेल्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये त्यांचा दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. या तपासात कोट्यवधी रुपयांचे गुन्ह्यांची माहिती समोर आलीय. जे ट्रस्टने कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांमध्ये वळवण्यात आले होते. ईडीने ४८ लाख रुपयांहून अधिक रोख आणि डिजिटल पुरावे जप्त केलेत.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीने अल-फलाह ग्रुपविरुद्ध तपास सुरू केलाय. फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाने बेकायदेशीर नफा कमावण्याच्या उद्देशाने विद्यार्थी, भागधारकांना फसवण्यासाठी NAAC मान्यताबाबत खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केले आहेत, असा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आले आहेत.
अल-फलाह विद्यापीठाने विद्यार्थी आणि सामान्य जनतेला फसवण्यासाठी गुप्त हेतूने यूजीसी कायदा, १९५६ च्या कलम १२(ब) अंतर्गत यूजीसी मान्यता असल्याचा खोटा दावा केला होता असाही आरोप करण्यात आलाय. युजीसीनुसार, विद्यापीठाचा समावेश फक्त कलम २(फ) अंतर्गत राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून करण्यात आला होता, त्यांनी कधीही कलम १२(ब) अंतर्गत समावेशासाठी अर्ज केला नव्हता आणि त्या तरतुदीनुसार अनुदानासाठी पात्र नाहीये.
अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना ०८.०९.१९९५ रोजी एका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट डीडद्वारे करण्यात आली आहे. यात जवाद अहमद सिद्दीकी यांना पहिल्या विश्वस्तांपैकी एक म्हणून नाव देण्यात आले. त्यांना व्यवस्थापकीय विश्वस्त बनवण्यात आले होते. गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न निर्माण झाल्याचे उघड झाले आहे. पुराव्यांवरून असे दिसून येते की ट्रस्टने कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांना कोट्यवधी रुपये वळवले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.