delhi BJp leader jitu chaudhary murder saam tv
देश विदेश

दिल्लीत भाजप नेत्याची हत्या! घराबाहेरच अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

नरेश शेंडे

दिल्ली : येथील मयूर विहारच्या फेज-३ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी भाजपच्या स्थानिक नेत्याची त्याच्या घराबाहेर गोळीबार करुन हत्या केलीय. ही घटना बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जीतू चौधरी (Jitu chaudhary Murder) असं हत्या झालेल्या भाजपच्या (BJP) नेत्याचं नाव आहे. चौधरी यांची हत्या करुन हल्लेखोर फरार झाले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांना घटनास्थळी काडतुसं आणि इतर महत्वाचे पुरावे मिळाले असून प्रत्यक्षदर्शींचा तपास सुरु आहे. याप्रकरणी (Police FIR Filed) अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहीती डीसीपी प्रियंका कश्यप यांनी दिलीय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, जीतू चौधरी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णलयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौधरी हे दिल्लीचे मयूर विहारचे भाजपचे स्थानिक नेते होते. अज्ञात हल्लेखोर बाईकवर सवार होते त्यावेळी त्यांनी चौधरी यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर आलीय. चौधरी यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

पैशांच्या गैरव्यवहारामुळं चौधरी यांची हत्या ?

जीतू चौधरी यांच्या हत्या ठेकेदाराकडून घेतलेल्या पैशांच्या गैरव्यवहरातून झाल्याची चर्चा आहे. बुधवारी सात-आठ वाजताच्या सुमारास गाजीपूर पोलीसांच्या पथकानं पेट्रोलिंग करत असताना मयूर विहार मध्ये लोकांची गर्दी झालेली पाहिली. त्यानंतर चौधरी यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT