दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. भाजपकडून आज दिल्लीतील जनतेसाठी मोठं-मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीच्या जनतेच्या मनात उतरण्यासाठी भाजपने महिलांसाठी मोठं-मोठ्या योजनांची घोषणा केलीय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज संकल्प पत्र जाहीर केलय. यात महिलांना दर महिना २५०० रुपये, तसेच सिलेंडरसाठी ५०० रुपयांची सब्सिडी दिली जाणार आहे. यासह दिवाळी आणि होळीच्या सणावेळी मोफत सिलेंडर दिलं जाणार आहे.
दर महिन्याला महिलांना समृद्धी योजना अंतर्गत २५०० रुपये देण्यात येतील.
होळी आणि दिवाळीसाठी मोफत सिलेंडर दिलं जाणार.
सिलेंडरवर ५०० रुपयांचं अनुदान दिलं जाणार.
गर्भवती महिलांसाठी २१ हजार रुपये दिले जाणार.
पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा
दिल्लीमध्ये केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना लागू केली जाणार आहे.
झोपडपट्टीमध्ये ५ रुपयामध्ये पौष्टीक भोजन दिलं जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणाची कल्चर बदलंय. याआधी जाहीरनामा जाहीर केले जात होत होते. पण पक्षांना त्याचा विसर पडत होता. आता जाहीरनामा हे संकल्प पत्र होत असतं. जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात भाजपने रेकॉर्ड बनवलाय. तसेच भाजपने जाहीर केलेलं संकल्प पत्र हे विकसीत दिल्लीचं पायाभरणी करणारे आहे. पण भाजपचं सरकार आलं तर दिल्ली सरकारच्या योजना चालू राहतील. आमच्या सरकारच्या काळात २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेत. दिल्लीत ज्या जनकल्याण योजना चालू आहेत. त्या भाजपचं सरकार आल्यानंतरही चालू राहतील.
आत्तापर्यंत आम आदमी पक्षानेही अनेक मोठमोठी आश्वासनेही दिली आहेत. संजीवनी योजनेंतर्गत ६० वर्षांवरील व्यक्तींना खासगी आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचार दिले जातील. पुजारी ग्रंथी योजनेंतर्गत दरमहा १८ हजार रुपये दिले जातील. महिला सन्मान योजनेंतर्गत दरमहा २१०० रुपये दिले जातील.
काँग्रेसनेही ५ गॅरंटी दिलीय. काँग्रेसनेही महागाई मुक्ती योजनेअंतर्गत मोफत राशन किट, ५०० रुपयाच गॅस सिलेंडर, वीज बिलात ३०० युनिटवर सूट, महिलांसाठी प्रत्येक महिन्याला २५०० रुपये. जीवन रक्षा योजनेंतर्गत २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार करणार. तसेच उड्डाण योजने अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी ८५०० रुपये दर महिन्याला दिले जातील, असे आश्वसन काँग्रेसने दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.