Scooter Fire Saam Tv
देश विदेश

Scooter Fire : अत्यंत संतापजनक! स्कूटरला लागलेल्या आगीच्या विळख्यात सापडली महिला; लोक करत होते व्हिडीओ शूट

Dehradun News : अत्यंत संतापजनक! स्कूटरला लागलेल्या आगीच्या विळख्यात सापडली महिला; लोक करत होते व्हिडीओ शूट

Satish Kengar

Dehradun News :

एक अत्यंत संतापजनक प्रकार घडलेला आहे. येथील डांगेला परिसरात एका 24 वर्षीय महिलेच्या स्कूटरला आग लागल्याने आगीत होरपळून तिचा मृत्यू झाला. महिला आगीच्या विळख्यात सापडली तेव्हा तिथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र इतकी लोक असूनही कोणीही या महिलेची मदत करण्यासाठी पुढं आलं नाही. उलट अनेक लोक या घटनेचा व्हिडीओ शूट करत होते.

या घटनेचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. आता उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रंजना असं मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना ही उत्तरकाशी शहरातील चिन्यालीसौर भागातील रहिवासी होती. जिथे ती एका फार्मसीमध्ये काम करत होती. ती डेहराडूनहून चिन्यालिसौरला जात असताना तिच्या स्कूटरने पेट घेतला.  (Latest Marathi News)

'टाइम्स ऑफ इंडिया'ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''या महिलेला मदत करण्या ऐवजी अनेक लोक तिचे व्हिडीओ शूट करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी थांबले होते. आम्हाला सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडीओही सापडले आहेत.''

पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, ''आम्ही काही लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली. मात्र त्यांचं म्हणणं होतं की, ते तिला मदत करू शकत नाहीत, कारण तीच शरीर 80 टक्के भाजलं होतं. यातच पोलिस रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.''

घटनास्थळापासून 2 किमी अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फूटजमध्ये ही महिला कोणत्याही अडचणीशिवाय तिच्या स्कूटरवरून जाताना दिसली होती. तिच्या वाहनाला काही विद्युत बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

SCROLL FOR NEXT