संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भारताच्या सीमेबाबत बोलताना मोठं विधान केलंय. सिंध आज भारताचा भाग नसला तरी, सीमा कधीही बदलू शकतात आणि सिंध भारतात परत येऊ शकते. असं विधान राजनाथ सिंह यांनी केलंय. ते कार्यक्रमात बोलत होते, त्यावेळी त्यांनी सिंधच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची आठवण करून दिली. १९४७ च्या फाळणीनंतर सिंध प्रदेश पाकिस्तानला देण्यात आला. तिथे राहणारे बहुतेक सिंधी हिंदू भारतात स्थलांतरित झालेत
यावेळी राजनाथ सिंह यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या पुस्तकाचा दाखला दिला. अडवाणी यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या पिढीतील सिंधींना सिंधचे भारतापासून वेगळे होणे स्वीकारता आलेले नसल्याचं लिहिलंय. सिंधू नदी भारतातील हिंदूंसाठी नेहमीच पवित्र राहिलीय. सिंधमधील अनेक मुस्लिमांनीही तिची शुद्धता झमझमच्या शुद्धते इतकीच पवित्र मानल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले. आज सिंध भौगोलिकदृष्ट्या भारताचा भाग नसला तरी, सभ्यता आणि संस्कृतीच्या बाबतीत तो नेहमीच भारताचा भाग राहील." सीमा बदलू शकतात आणि कोणाला माहित उद्या सिंध भारतात परत येऊ शकते.असंही मंत्री राजनाथ सिंह म्हणालेत.
मोरोक्कोमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना संरक्षण मंत्र्यांनी पीओके बाबत विधान केलंय. भारत कोणत्याही आक्रमक कारवाईशिवाय पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मिळवेल. पीओकेमधील लोक स्वतःहून आवाज उठवू लागले आहेत. ते 'स्वातंत्र्याची' मागणी करू लागलेत. दर ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक तज्ज्ञांनी भारताने पीओकेचा आपला भाग परत घ्यावा. त्यावर बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, परिस्थिती या दिशेने बदलत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.