Dawood Ibrahim Saam TV
देश विदेश

दाऊदचा भारतावर पुन्हा हल्ल्याचा कट, NIAच्या चौकशीत खुलासा, मोठी रक्कम भारतात पाठवली

दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जाणारा छोटा शकील भारतात हल्ले करण्याची शक्यता आ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : दाऊदची डी कंपनी भारताविरोधात मोठ्या हल्ल्याचा कट आखत आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) याबाबत मोठा खुलास केला आहे. टेरर फंडिंग प्रकरणात ही माहिती उघड झाली आहे. NIA ने केलेल्या चार्जशीटमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

NIA ने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा मानला जाणारा छोटा शकील भारतात हल्ले करण्याची शक्यता आहे. दाऊदने यासाठी पैसे देखील पाठवले असल्याची माहिती NAIने दिली आहे. दाऊदने या कारवायांसाठी पाकिस्तानहून दुबईला आणि दुबईहून सूरत आणि मुंबईला 25 लाख रुपये पाठवले आहेत. ही रक्कम आरिफ शेख आणि शब्बीर शेख या व्यक्तींना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गेल्या 4 वर्षात हवाल्याच्या माध्यमातून 12 ते 13 कोटी रूपये पाठवल्याचा माहितीही समोर आली आहे. (Latest News)

NIAने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रशीद मारफानी उर्फ ​​रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम करत होता. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे तो दुबईत भारतात पाठवायचा, ही माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

आरोपपत्रात दाऊद, शकील, त्याचा मेहुणा सलीम फल, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून 25 लाख रुपये भारतात कसे पाठवले गेले. एनआयएने दावा केला आहे की शब्बीरने 5 लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. 9 मे 2022 रोजी शब्बीरच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

अनेक शहरे डी कंपनीच्या टार्गेटवर होती

एनआयएच्या आरोपपत्रानुसार, भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला देशातील बडे राजकारणी आणि अनेक बड्या व्यक्तींना लक्ष्य करायचे होते. एवढेच नाही तर भारतातील विविध शहरांमध्ये दंगल घडवण्यासाठी दाऊदने मोठी रक्कमही पाठवली होती. त्यामध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या यादीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT