Congress : भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू

नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस (Congress) नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे
Congress leader Krishna Kumar Pandey death
Congress leader Krishna Kumar Pandey deathSaam TV

Congress Bharat Jodo Yatra : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस (Congress)  नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्ण कुमार पांडे असं मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचं नाव आहे.

Congress leader Krishna Kumar Pandey death
Eknath Shinde : सत्तारांच्या विधानानंतर CM शिंदे नाराज; वादग्रस्त नेत्यांचे कान टोचणार?

कृष्ण कुमार पांडे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर पांडे यांनी यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. यादरम्यान, पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच पांडे यांचा मृत्यू झाला होता.

कृष्ण कुमार पांडे हे मूळ नागपुरचे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी दु:ख व्यक्त करत पांडे यांना श्रद्धांजली वाहली.

Congress leader Krishna Kumar Pandey death
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश; वाचा संपूर्ण यादी

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये दाखल झाली आहे. हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. अनेकांच्या हातात मशाली आहेत. राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात आगमन होताच प्रचंड फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते लोक सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी स्वतः आपल्या हातात मशाल घेऊन पुढे होते. प्रचंड उत्साह आणि भारत जोडोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मशाल यात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. सोमवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटाला सुरू झालेली मशाल पदयात्रा चाळीस मिनिटे पुढे येऊन देगलूरमध्ये पोहचली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com