Eknath Shinde : सत्तारांच्या विधानानंतर CM शिंदे नाराज; वादग्रस्त नेत्यांचे कान टोचणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले असून ते आपल्या गटातील मंत्री तसेच नेत्यांची कानउघडणी करणार असल्याची माहिती आहे.
Eknath Shinde group
Eknath Shinde groupSaam TV
Published On

CM Eknath Shinde News : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार तसेच मंत्री अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येताहेत. या मंत्र्यांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार करताहेत. सोमवारी (७ नोव्हेंबर) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्षेपार्ह विधान केलं. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  प्रचंड नाराज झाले असून ते आपल्या गटातील मंत्री तसेच नेत्यांची कानउघडणी करणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde group
VIDEO : ‘हर हर महादेव’वरून रणकंदन; मिटकरी-खोपकरांमध्ये बाचाबाची, ठाण्यात काल रात्री काय घडलं?

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचं एकदिवसीय शिबिर होणार आहे. या शिबिरात शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची कानउघडणी देखील करणार असल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) , संतोष बांगर तसंच गुलाबराव पाटील हे वाच्याळ वक्तव्य करताना दिसून आले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दिवसेंदिवस शिंदे सरकारच्या अडचणी वाढत आहे. दुसरीकडे भाजप देखील शिंदे गटातील या वादग्रस्त नेत्यांमुळे नाराज असल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde group
Anil Parab : शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वादग्रस्त नेत्यांचे कान टोचणार असल्याची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी शिंदे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शिंदे गटाचे सर्व आमदार तसंच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आगामी काळात पक्षाची रणनिती काय असणार यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सत्तारांना माफी मागण्याचे आदेश

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झापलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सत्तारांना फोन करून त्यांनी कानउघाडणी केली आहे. माफी मागा, असे थेट आदेशही शिंदेंनी दिल्याचे समजते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com