Manasvi Choudhary
नवरात्री या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महिला विविध रंगाच्या साड्या नेसून सणाचा आनंद लुटतात.
नवरात्री या सणामध्ये रंगाना विशेष महत्व असल्याने उद्या नवरात्रीचा मोरपंखी रंग आहे. महिलांना मोरपंखी रंगाच्या साड्या खरेदी करायच्या असतील तर लेटेस्ट पॅटर्न्स पाहूया.
पारंपरिक पैठणी किंवा कांजीवरम या साडीपॅटर्नमध्ये तुम्ही मोरपंखी रंग निवडू शकता. सध्या हे साडी पॅटर्न्स ट्रेंडमध्ये आहेत.
जॉर्जेट आणि सिक्विन साड्या तुम्ही खास निवडू शकता. या साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत. खास गरबा लूकसाठी तुम्ही या साड्यांची निवड करू शकता.
प्लेन मोरपंखी साडीवर गुलाबी, केशरी किंवा गोल्डन रंगाचा डिझायनर ब्लाउज घालून तुम्ही स्टायलिश आणि हटके मॉडर्न लूक करू शकता.
ऑर्गन्झा फॅब्रिकवर मोरपंखी रंग आणि सुंदर फुलांची प्रिंट असलेली साडी तुम्ही निवडू शकता.
खास नवरात्री पूजेसाठी तुम्ही नाजूक सिल्व्हर किंवा गोल्डेज बॉर्डर असलेली मोरपंखी साडी निवडू शकता. जी अत्यंत सुंदर आणि कम्फर्टेबल दिसते.