Darjeeling Bridge Collapsed Saam Tv
देश विदेश

मुसळधार पावसाचा फटका, पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू; भूस्खलनामुळे रस्ते बंद

Darjeeling Bridge Collapsed: दार्जिलिंगमध्ये पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.

Priya More

Summary -

  • दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे दुडिया लोखंडी पूल कोसळला.

  • या दुर्घटनेत ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • मिरिक, सौरानी आणि विष्णू गावातील नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे.

  • भूस्खलनामुळे दार्जिलिंगकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

दार्जिलिंगमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. मिरिक परिसरातील दुडिया लोखंडी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. हा पूल मिरिक आणि आसपासच्या परिसराला सिलिगुडी - कुर्सियांगला जोडण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पूर, भूस्खलन आणि पूराच्या धोक्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळे येत आहेत.

स्थानिक प्रशासनाने सांगितले की, पावसामुळे हा पूल अचानक कोसळला. मिरिकमध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सौरानीमधील ३ नागरिक, मिरिकमधील २ नागरिक आणि विष्णू गावातील एका नागरिकाचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य वेगाने केले. पण भूस्खलन आणि पूरामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मुसळधार पावसामुळे दिलाराम गावात एक मोठं झाड कोसळलं आणि हुसैन खोलामध्ये भूस्खलन झाले. यामुळे दार्जिलिंगला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आता कुर्सियांग आणि दार्जिलिंगला पोहचण्यासाठी फक्त पंखाबाडी आणि एनएच ११० वरून जावे लागेल. तर कुर्सियांग ते दार्जिलिंगपर्यंत प्रवास करण्यासाठी डाउनहिल रोडचा वापर करावा लागेल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Car: सेकंड-हँड ई-कार घ्यायची आहे? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल मोठे नुकसान

Priyanka Chopra Video : प्रियंका च्रोपाने गळ्यात गुंडाळला साप, पती निक जोनस पाहतच राहिला

DMRC Recruitment: मेट्रोत नोकरीची संधी; पात्रता १२वी पास; आजच करा अर्ज

सोनं खरेदीदारांसाठी सुवर्णयोग; १० तोळं सोनं १९ हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही कमालीची घट

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक नदी नाल्यांना पूर

SCROLL FOR NEXT