Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Stunt Video: धडकला, धडपडला तरीही कार घेवून पळाला... पोलीसांपासून वाचण्यासाठी खतरनाक स्टंट; VIDEO पाहून चक्रावून जालं

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या सीनला लाजवेल असाच थरारक आहे..

Gangappa Pujari

Trending Chor Police Video: रस्त्यावर जीवघेणे स्टंट करणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपल्याही अंगावर काटा उभा राहतो. असे भयंकर स्टंट अनेकदा जीवघेणेही ठरु शकतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामधील ड्रायव्हरने अशा वेगात गाडी पळवली आहे, जी पाहून तुम्हीही चक्रावून जाल. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवास करताना अनेकदा पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागतो. अनेक तरुण पोलिसांना पाहताच आपला मार्गही बदलतात. कधीकधी पोलिसांना चकवा देत धूमही ठोकतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस आणि एका एसयुव्ही कार चालकाच्या पाठलागाचा थरार पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी पाठलाग करायला सुरूवात करताच या कारचालकारने अशी काही गाडी पळवली आहे, जी पाहून नेटकऱ्यांनीही डोक्याला हात लावला आहे. कार पळवताना या चालकाचा भीषण अपघातही होतो, मात्र तरीही न थांबता तो पुन्हा सुसाट गाडी घेवून पसार झाल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मर्सिडीज भरधाव वेगाने रस्त्यावर पळत आहे आणि कारमागे पोलिसांची गाडी त्यांचा पाठलाग करत आहे. तेवढ्यात मर्सिजडीज समोरच्या ट्रकला धडकते आणि दुसऱ्या साईडला जाऊन पडते. तरीही तो कारवाला ती गाडी घेऊन पळून जातो. एकंदरीत तो पोलीसांपासून पळत असल्याचं दिसत आहे. हा खतरनाक स्टंट सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनाही हा व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी ट्विटरवर (Twitter) हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी "नाही, नवीन एसयूव्हीच्या चाचणीचा हा भाग नाही!" असा मजेशीर कॅप्शन या दिला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत कार चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day: राज्यात चिकन, मटण बंदी? स्वातंत्र्यदिनी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला?

Maharashtra Politics: मनसे-शिवसेनची टाळी वाजली; पण राज ठाकरेंसाठी आघाडीची दारी अजून बदंच!

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री उद्या घेणार राज्यातील गणेशोत्सवाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार, तर नेहरू आणि इंदिरा गांधींना किती वेळा मिळाला हा मान?

Maharashtra Politics : अजित पवार गटाला हादरा! बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT