Cyclones In India: देशामध्ये दक्षिण भारतात सध्या मंडस चक्रीवादळ धडकणार असल्याने प्रशाकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तमिळनाडू, आंध्रप्रदेशसह पाँडेचरीमधेही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतकेच नव्हेतर धोक्याची तीव्रता लक्षात घेवून विविध ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. भारतात अशा प्रकारची वादळे वारंवार येत असतात. या आधी आलेल्या तौक्ते तसेच निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते. अनेक वादळांमध्ये जीवितहानीही झाली आहे. जाणून घेऊया याआधी आलेल्या विनाशकारी चक्रीवादळांबद्दल. (Weather Latest News)
देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाच निवार वादळाने (Cyclone) गोंधळ घातला होता. निवार वादळाच्या आधी मे महिन्यात एम्फन आणि जूनमध्ये आलेल्या निसर्ग वादळाने प्रचंड नुकसान केले होते. एम्फन वादळाची सर्वाधिक झळ पश्चिम बंगाल आणि ओडिसाला लागली. या विनाशकारी वादळामुळे 1.3 कोटी नागरिक जखमी झाले तर भारत आणि बांग्लादेशमध्ये जवळपास 102 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी हवेचा वेग तब्बल 130-140 किमी प्रतितास इतका होती.
ओडिसा राज्यात २०१९ मध्ये आलेल्या फानी वादळाने चांगलाच हाहाकार माजवला होता. या विनाशकारी वादळामध्ये 72 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या महाकाय वादळाची तुलना 1999 मध्ये आलेल्या चक्रिवादळाशी केली जात होती. तब्बल 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने घोंघावणाऱ्या वाऱ्यांमुळे असंख्य झाडे, घरे तसेच अनेक बसेसही उलटल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. (Maharashtra News)
सुमारे 130 किलोमीटर प्रतितास या प्रचंड वेगाने आलेल्या वर्धा चक्रिवादळाने २०१६ मध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. या विनाशकारी वादळात 18 लोकांचा मृत्यू झाला होता. इतकेच नव्हेतर लाखो झाडे उध्वस्त झाली होती. वर्धा चक्रिवादळाने सर्वाधिक नुकसान चेन्नई आणि अंदमान निकोबारमध्ये झाले होते. या वादळाची तीव्रता इतकी भयंकर होती की चेन्नईमध्ये अनेक दिवस विमानतळे बंद ठेवली होती.
महाभयंकर हुदहुद वादळाने 2014 मध्ये प्रचंड हाहाकार माजवला होता. 185 किलोमीटर प्रतितास वेग असलेल्या या वादळाने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम, ओडिसा आणि उत्तर प्रदेशात धुमाकूळ घातला होता. या वादळाच्या तडाख्यात 124 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर उत्तर प्रदेशात 18 जणांना जीव गमवावा लागला होता. या विनाशकारी संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने 1000 कोटीचा मदतनिधी जाहिर केला होता.
ऑक्टोंबर 2013 मध्ये फैलिन वादळाने भारतात धडक दिली होती. या विनाशकारी चक्रिवादळात 50 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर करोडो नागरिक जखमी झाले होते. सुमारे 200 किलोमीटर प्रतितास वेगाने घोंघावणाऱ्या या वादळाचा आंध्रप्रदेश, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल,छत्तीसगड आणि बिहारला मोठा फटका बसला होता. भारतासोबतच नेपाळलाही या वादळाने चांगलेच झोडपले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.