Cyclone Mandous: अस्मानी संकटाला घाबरु नका! चक्रीवादळाआधी आणि नंतर घ्या 'ही' विशेष काळजी

Cyclone Mandous News: देशावर सध्या मंडस चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Cyclone Mandous
Cyclone MandousSaam Tv
Published On

Cyclone Mandous News: देशावर सध्या मंडस चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेवून तामिळनाडू सरकारने शुक्रवारी चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि वल्लोर जिल्ह्यांतील शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मंडूस वादळाचा धोका लक्षात घेत दक्षिण भागातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.  (Weather Latest News)

Cyclone Mandous
Cyclone Mandous : अस्मानी संकटे का येतात? चक्रीवादळाच्या धोक्याची तीव्रता कशी ओळखतात? जाणून घ्या सविस्तर एका क्लिकवर...

देशावर याआधीही अनेकदा अशा प्रकारच्या चक्रीवादळे (Cyclone) धडकली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तसेच साधनसंपत्तीचेही नुकसान झाले होते. त्यामुळेच अशा अस्मानी संकटाना तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच प्रत्येकाने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशी अस्मानी संकटे आल्यावर कोणती खबरदारी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी प्रामुख्याने टाळाव्यात हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.  (Maharashtra News)

संकट काळात 'या' गोष्टींची खबरदारी घ्या..

1. चक्रीवादळावेळी अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाकडून सुचना मिळाल्याशिवाय घराबाहेर पडू नका. प्रशासनाकडून सुचना मिळाल्यानंतरच जवळील सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.

2. गाडीने प्रवास करने शक्यतो टाळा. आवश्यक असल्यास अलर्ट जारी करण्याआधीच घराबाहेर पडा.

3. वादळी, वाऱ्यामुळे टेलिफोनच्या तारा किंवा लोखंडी पाईपमध्ये वीज संचार होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा वस्तूंपासून दुर रहा. घरातील विद्युत उपकरणांचा विज प्रवाह बंद करा तसेच टेलिफोन किंवा विद्युत उपकरणांचा वापर टाळा.

4. घराच्या गच्चीवर जाणे टाळा. तसेच जुन्या घराजवळ किंवा झाडाखाली उभे राहु नका.

5. वादळांवर लक्ष ठेवा. वाऱ्याचा वेग कमी होताच वादळाची तीव्रता कमी झाली असे समजू नका. अशावेळी दुसऱ्या दिशेने संकट संकट येण्याची शक्यता असते.

6. प्रवास करताना गाडी समुद्रकिनारे, झाडे तसेच विद्युत खांबापासून दूर ठेवा.

Cyclone Mandous
Cyclone Mandous : देशावर मंदोस चक्रीवादळाचं संकट ; 'या' राज्यातील नागरिकांना वादळाचा तडाखा बसणार

संकट टळल्यानंतर घ्या 'ही' विशेष काळजी?

1. प्रशासनाकडून अधिकृत सुचना मिळाल्याशिवाय घराबाहेर पडू नका.

2. घरातील गॅस सुरू करण्यापुर्वी भिजला नसल्याची खात्री करुन घ्या. भिजला असल्यास तो विद्युत उपकरणांपासून दूर ठेवा.

3. घराबाहेर पडल्यानंतर आणि बराच काळ बाहेर राहिल्यानंतर सुचना मिळाल्याशिवाय घराकडे जाऊ नका. घरी परतताना मोकळ्या रस्त्याचा वापर करा. यासाठी अतीघाई करु नका.

4. वादळानंतर पडलेल्या विजेच्या तारा, दुर्घटनाग्रस्त पूल तसेच पडलेली घरे आणि झाडांपासून लांब रहा.

5. सर्पदंश टाळण्यासाठी फिरताना हातात काठी बाळगा.

6. पुरग्रस्त भागात प्रवेश करणे टाळा.

7. घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा तसेच किटकनाशके फवारा.

Published By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com