Cyclone Michaung Saam tv
देश विदेश

Cyclone Michaung: येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात 'मायचॉन्ग' चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Cyclone Michaung: बंगालच्या उपसागरात वातावरणात बदल होईल, त्यानंतर त्याचं वादळात रुपांतरित होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Vishal Gangurde

Cyclone Michaung Updates:

बंगास उपसागराच्या आग्नेय आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आता पूर्णपणे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झालं आहे. यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी चक्रावादळाचा इशारा दिला आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात वातावरणात बदल होईल, त्यानंतर त्याचं वादळात रुपांतरित होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदलामुळे वादळ पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याचा अंदाज आहे. वातावरणात बदल होऊन हळूहळू ३० नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरातील दक्षिणेच्या खोल दबाव क्षेत्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४८ तासांत नैऋत्य आणि दक्षिण -पूर्व बंगालच्या उपसागरात 'मायचॉन्ग' चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका मीडिया वृत्तानुसार, विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निकोबार बेटांवरील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर अंदमान बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ३० नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या चक्रिवादळाच्या इशाऱ्यामुळे २५-३५ किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. हे वारे ताशी ४५ किलोमीटर प्रतितासात पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

२९ नोव्हेंबर रोजीही दक्षिण अंदमान समुद्र आणि अंदमान,निकोबार बेटांवर वारे वाहण्याची शक्यता आहे. तर बंगाल उपसागराच्या आग्नेय दिशेलाही ३० नोव्हेंबर रोजी ताशी ४०-५० किलोमीटर प्रतितास ते ताशी ६० किलोमीटर प्रतितासाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

एक डिसेंबरपर्यंत या वाऱ्याचा वेग ५०-६० किलोमीटर प्रतितास ते ताशी ७० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर २ डिसेंबरपर्यंत या वाऱ्याचा वेग ६०-७० किलोमीटर ते ८० किलोमीटरपर्यंत प्रतितास होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT