Cyclone Dana Saam Tv
देश विदेश

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Satish Kengar

अंदमान समुद्रात 'दाना' नावाचा चक्रीवादळ तयार झाला आहे. हा चक्रीवादळ 23 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचेल. 24 ऑक्टोबर रोजी दाना ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकेल. त्याचा फटका पुरीला बसू शकतो, असा अंदाज आहे. सौदी अरेबियाने या वादळाला दाना हे नाव दिले आहे. दाना या नावाचा अर्थ उदारता असल्याचं बोललं जात आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 23 ऑक्टोबरपासून ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जो 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून 25 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत 120 किलोमीटर प्रतितास होईल.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, वादळ येण्याच्या एक दिवसआधी म्हणजे 23 ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस सुरू होईल. 24-25 ऑक्टोबर रोजी ओडिशा-बंगालच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी 20 सेमी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी 30 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

चक्रीवादळाचा या 3 राज्यांवर धडकणार

पश्चिम बंगाल: पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगणा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर कोलकाता, हावडा, हुगळी आणि झारग्राममध्ये 23 ते 24 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ओडिशा: 24 ऑक्टोबर रोजी पुरी, खुर्दा, गंजम आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह अति मुसळधार पाऊस (20 सेमी पेक्षा जास्त) पडू शकतो. येथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : राज्यात रणधुमाळी सुरू; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात!

Guru-Shani Vakri: दिवाळीत गुरु-शनी चालणार उलटी चाल; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसे

Maharashtra Assembly Election : भाजपला मुंबईत हादरा, तिकीट न दिल्याने मोठा नेता साथ सोडणार, तुतारी फुंकणार?

Maharashtra Assembly Election : भाजपचा अजित पावरांसाठी 'त्याग', अकोट सोडलं? अमोल मिटकरींना तिकीटासाठी दादांचा फोन!

Weather Updates : मुंबई, ठाण्याला आज पाऊस झोडपणार, राज्यात कुठे काय स्थिती?

SCROLL FOR NEXT