Biporjoy Gujarat News Saam TV
देश विदेश

Cyclone Biparjoy: 'बिपरजॉय'चा गुजरातमध्ये कहर, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

'बिपरजॉय'चा गुजरातमध्ये कहर, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Satish Kengar

Cyclone Biparjoy Update News: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झालं आहे. बिपरजॉयने सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारी भागात लँडफॉल होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे सुरू राहणार आहे. चक्रीवादळामुळे गुजरातमधील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. किनारी भागात वादळाचा तडाखा बसला आहे. ताशी १०० ते १३० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.

कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी वीज खंडित करण्यात आली होती. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) व्यतिरिक्त, लष्कर, हवाई दल, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (BSF) कर्मचारी देखील सज्ज झाले आहेत.

वादळामुळे वाऱ्याचा कमाल वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची भीती आहे. प्रदेशात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन आठ किनारी जिल्ह्यांमधून ९४,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफच्या १२ तुकड्यांव्यतिरिक्त, भारतीय सैन्य, नौदल, हवाई दल, भारतीय तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दलच्या (BSF) जवानांना मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सैन्याने भुज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथेबचावकार्यासाठी २७ तुकड्या तैनात केल्या आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी ओखा, पोरबंदर आणि बकासूर येथे प्रत्येकी पाच गोताखोर आणि चांगले जलतरणपटू असलेल्या १० -१५ टीम्स तैनात केल्या आहेत.

सीमा सुरक्षा दलाने बचाव कार्यासाठी आवश्यक संसाधने गोळा केली आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या बुलेटिनमध्ये, आयएमडीने म्हटले आहे की, चक्रीवादळाचा कहर मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. आयएमडीने म्हटले आहे की, चक्रीवादळमुळे अत्यंत मुसळधार पाऊस होईल आणि २-३ मीटर उंचीच्या लाटा उसळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT