Cyclone Biparjoy Update: अंतराळातून टिपली चक्रीवादळ बिपरजॉयचे फोटो, काही वेळतात गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ

अंतराळातून टिपली चक्रीवादळ बिपरजॉयचे फोटो, काही वेळतात गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ
Cyclone Biparjoy Satellite Photo
Cyclone Biparjoy Satellite PhotoSaam Tv
Published On

Cyclone Biparjoy Satellite Photo: बिपरजॉय चक्रीवादळाची भीती वाढत चालली आहे. हा वादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीराने (ISS) या अंतराळातून टिपलेले चक्रीवादळाचे काही फोटो शेअर केले आहेत.

संयुक्त अरब अमिरातचे (UAE) अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अरबी समुद्रावर चक्रीवादळ बिपरजॉयचे काही फोटो पोस्ट केली आहेत. अल नेयादी यानो हे फोटो शेअर करत लिहिले आहे की, "मी मागील व्हिडीओमध्ये बोलल्या प्रमाणे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या #Biparjoy चक्रीवादळाचे काही फोटो शेअर करत आहे, जी मी दोन दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरून क्लिक केली." (Latest Marathi News)

Cyclone Biparjoy Satellite Photo
Nagpur News: भाजपचे 2 माजी आमदार BRS च्या गळाला! के चंद्रशेखर राव यांचं नागपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

अल नेयादी यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये अरबी समुद्रावर एक प्रचंड वादळ तयार होऊन भारतीय किनारपट्टीकडे जाताना दिसत होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "मी क्लिक केलेले हे फोटो पाहा, अरबी समुद्रावर चक्रीवादळ कसे तयार होत आहे.''

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 74,000 हून अधिक लोकांना किनारी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे वादळ गुरुवारी संध्याकाळी कच्छला धडकण्याची शक्यता असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या गुजरात किनारपट्टीपासून सुमारे 85 किमी अंतरावर आहे. या वादळामुळे गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात तसेच पाकिस्तानच्या किनारी भागात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com