Cyber Crime Saam tv
देश विदेश

Delhi AIIMS News: दिल्लीतील एम्स रुग्णालयावर सायबर हल्ला; ३६ तासांपासून सर्व्हर निकामी झाल्यानं रुग्णांचे हाल

News about AIIMS Delhi server: धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 36 तासांपासून रुग्णालयाचे सर्व्हर डाऊन आहेत, यामुळे ओपीडीसह आपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी सेवा प्रभावित झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे, नवी दिल्ली

AIIMS Delhi Hack News: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक (Cyber Attack) झाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून रुग्णालयाची सर्व्हर निकामी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होतायत.

रुग्णालयाचं कामकाज ऑनलाईन बंद असून सध्या मानवी बळाद्वारे (मॅन्युअली) कामकाज सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 36 तासांपासून रुग्णालयाचे सर्व्हर डाऊन आहेत, यामुळे ओपीडीसह आपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी सेवा प्रभावित झाल्या आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Delhi AIIMS Hospital News)

दिल्ली एम्स (All India Institute Of Medical Science, Delhi) हे देशातील सर्वात प्रतिष्ठित रुग्णालय आणि संशोधन संस्था आहे. एम्स दिल्लीचा सर्व्हर दोन दिवस उलटूनही सुरळीत होऊ शकलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी संध्याकाळी एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता भारतीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही काल, गुरुवारी एम्समध्ये पोहोचले होते. चीनकडून हा सायबर हल्ला झाला आहे का? या अॅंगलने याचा शोध घेतला जात आहे. एम्स व्यवस्थापनाने सायंकाळी उशिरा संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, आयटी मंत्रालयाशिवाय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित इतर एजन्सी एम्सची यंत्रणा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT