Live Hindustan
देश विदेश

Bomb Threat: देशातील CRPF शाळा टार्गेटवर; ईमेलद्वारे दिली बॉम्बने उडवण्याची धमकी

CRPF schools Bomb Threat: देशातील अनेक सेंट्रल रिजर्व्ह पोलीस दलाच्या शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळालीय. या शाळा दिल्ली आणि हैदराबाद येथे आहेत.

Bharat Jadhav

देशातील अनेक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळालीय. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय. हे मेल शाळांच्या व्यवस्थापकीय मंडळांना सोमवारी रात्री प्राप्त झालेत. दरम्यान दोन दिवसापूर्वी रोहिणीमधील प्रशांत विहारमध्ये स्फोट झाला होता. त्यानंतर आज सीआरपीएफच्या शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलीय.

या धमकीप्रकरणामध्ये खालिस्तानी संघटनांचा सहभाग आहे का याबाबतचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. सोमवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी टेलिग्राम ॲपला पत्र लिहिले. या पत्रात टेलिग्रामकडून बॉम्बची धमकी कोणत्या वाहिनीवर देण्यात आली होती, याची माहिती मागवण्यात आलीय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय विमानात बॉम्ब असल्याच्या धमक्या आल्या आहेत. दरम्यान या बनावट धमक्या होत्या परंतु तब्बल १०० पेक्षा जास्त विमानांना धमकी देण्यात आली होती.

घटनेच्या आदल्या रात्रीपासून एका संशयिताचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळाले असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. स्फोट घडण्याआधी त्या घटनेच्या ठिकाणी पाहण्यात आलेल्या लोकांची विचारपूस पोलिसांकडून केली जात आहे. रविवारच्या स्फोटानंतर काही तासांनंतर, 'जस्टिस लीग इंडिया' नावाच्या चॅनेलची एक कथित टेलिग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोस्टमध्ये बॉम्बस्फोटाचा व्हिडिओ आहे ज्याच्या खाली 'खलिस्तान झिंदाबाद' वॉटरमार्क आहे.

चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती

चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडालीय. एअर इंडियाच्या AI १२७ फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT