Policewoman killed by CRPF boyfriend in fit of rage 
देश विदेश

लिव्ह-इन पार्टनरची हत्या! CRPF जवानाने महिला ASI चा गळा दाबून जीव घेतला, अन्...

CRPF jawan kills woman ASI in live-in relationship dispute : गुजरातमधील अंजारमध्ये सीआरपीएफ जवानाने लिव्ह-इन पार्टनर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा गळा दाबून खून केला. नंतर पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.

Namdeo Kumbhar

CRPF jawan murder, woman ASI killed, live-in partner crime : २५ वर्षाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची लिव्ह-इन पार्टनरने गळा दाबून हत्या केली. पार्टनरचा जीव घेतल्यानंतर CRPF जवान महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस स्टेशनमध्येच सरेंडर केले. शुक्रवारी रात्री सीआरपीएफ जवान आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या सीआरपीएफ जवानाने महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्यानेही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी अंजार पोलिसात त्याने सरेंडर केले.

मृत्यू झालेल्या महिला पोलीस (ASI) अधिकाऱ्याचे नाव अरूणा जाधव असे आहे, ती अंजार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. तिचा लिव्ह-इन पार्टनर दिलीप जाधव हा CRPF मध्ये कार्यरत आहे, त्याची सध्याची पोस्टिंग मनिपूरमध्ये आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघेंमध्ये प्रेमसंबंध होते. ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शेजारच्या गावातील ते मूळचे आहेत. अरुणा ही लख्तर तालुक्यातील डेरवाला गावातील होती आणि दिलीप हा लिंबडी तालुक्यातील टोकराला गावातील होता. अरूणा आणि दिलीप लग्न करणार होते, पण त्याआधीच अक्रीत घडलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही सुट्टीवर होते, फिरण्यासाठी आणि शॉपिंगसाठी अहमदाबादला गेले होते. पोलिस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले, शुक्रवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. रागाच्या भरात दिलीपने अरुणाचा गळा दाबून खून केला. पण थोड्यावेळानंतर त्याला आपली चूक समजली अन् त्याने चाकूने आपले मनगट कापले, फिनायल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याला उलटी झाली आणि तो वाचला.

हा धक्कादायक प्रकार अंजार येथील गंगोत्री सोसायटीतील फ्लॅटमध्ये झाला, तिथे अरूणा आणि दिलीप लिव्ह इन मध्ये राहत होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अरूणा आणि दिलीप यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचा आवाज ऐकू आला. दरम्यान, शुक्रवारी रात्री अरूणाची हत्या केली, त्यानंतर दिलीप शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत मृतदेहासोबतच होता. शनिवारी सकाळी तो अंजार पोलिस स्टेशनमध्ये गेला हत्या केल्याची कबुली दिली.

दिलीपने अरूणाच्या खूनाबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर एकच खळबळ अंजारमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ दिलीपला ताब्यात घेतलं अन् घटनास्थळावर धाव घेतली. अरूणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT