Pune Parrot News Saam TV
देश विदेश

Parrot News : पोपटाने केला मालकिणीच्या‌ हत्येचा उलगडा, 9 वर्षांनंतर दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Uttar Pradesh News: हत्येत महिलेच्या पतीच्या भाच्याच्या हात असल्यानं निष्पन्न झाल्याने अनेकांना धक्का बसला होता.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमध्ये घरातील पोपटाच्या मदतीन महिलेच्या हत्येचा छडा लागला आहे. तब्बल 9 वर्षांनंतर या प्रकरणी दोषींना गुरुवारी (23 मार्च 2023) शिक्षा झाली आहे. पोपटाने घेतलेल्या नावावरुन तपासाची चक्र फिरली आणि पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. हत्येत महिलेच्या पतीच्या भाच्याच्या हात असल्यानं निष्पन्न झाल्याने अनेकांना धक्का बसला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलम शर्मा या महिलेची 20 फेब्रुवारी 2014 रोजी आग्रा येथे राहत्या घरी हत्या झाली होती. घटना घडली त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. घरातील सर्व मंडळी लग्नानिमित्त बाहेर गेले असताना आरोपींनी हा डाव साधला. नीलम यांच्या पाळीव कुत्र्यालाही आरोपींनी ठार केलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरु केला. दरम्यान मृत नीलम यांच्या पाळीव पोपटाने आरोपींची नाव सांगितल्याने सर्वच जण चकीत झाले. (Latest News Update)

पोपटाने ज्यावेळी आरोपींची नावं घेतली त्यावेळी अनेकांना विश्वास बसला नाही. कारण पोपट महिलेच्या पतीच्या भाच्याचं आणि मित्राचं नाव घेत होता. त्यानंतर पोलिसांनी भाचा आशुतोष आणि त्याचा मित्र रॉनीची सखोल चौकशी केली. त्यावेळी दोघांनी मिळून पैशासाठी नीलमची हत्या केल्याचं कबूल केलं.

त्यानंतर तब्बल 9 वर्ष या प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. गुरुवारी या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. कोर्टाने महिलेच्या हत्येप्रकरणी आशुतोष गोस्वामी आणि राणी मॅसी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच ७२ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: जोडीदारासोबत छान वेळ घालवता येणार, पैसा कमी खर्च होईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं टाकला डाव; भाजपच्या अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभेत मोठा राडा! शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप, जितेंद्र आव्हाडांना निलंबन करण्याची मागणी; नेमके काय घडले? VIDEO

Iran-US War: खामेनेईंच्या मृत्यूनंतरही ट्रम्प इराणमधील राजवट का बदलू शकले नाहीत? सत्तांतर का झालं नाही? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: शिवरायांवरील वक्तव्यामुळे विधानसभेत गोंधळ; आव्हाडांनी सभागृहात मागितली माफी

SCROLL FOR NEXT