सॉफ्टवेअर कंपनीचे सीओओ परमजीत धनखड यांची हत्या.
पार्किंगच्या जागेवरून वाद झाल्याची माहिती.
परमजीत धनखड यांच्यावर १४ राऊंड फायर
सॉफ्टवेअर कंपनीचे सीओओ परमजीत धनखड यांची हरियाणातील फरिदाबाद येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लखनौमध्ये झालेल्या ट्रिपल मर्डरच्या घटनेप्रमाणे हे हत्याकांड झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सॉफ्टवेअर कंपनीचे सीओओवर अंधाधुंद फायरिंग करण्यात आली. १४ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यातील ९ गोळ्या त्यांना लागल्या असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. सूरजकुंड पोलीस ठाण्याकडून ही माहिती देण्यात आलीय. सूरजकुंड पोलीस ठाण्याचे एसएचओ (SHO) प्रल्हाद कुमार यांच्या सांगण्यानुसार, क्राईम ब्रँचने आरोपी अटक केलीय.
मोनू शर्मा असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पार्किंगच्या जागेत कुत्र्याने घाण केल्याच्या आणि वाहने उभी करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता. शुक्रवारी रात्री, परमजीत जिमवरून परतला तेव्हा त्याने मोनू शर्माला पार्क केलेलं वाहन हटवण्यास सांगितलं होत. मोनू शर्मा यांनी परमजीत यांच्या पार्किगच्या जागी वाहन उभे केले होते, त्यामुळे दोघात वाद झाला त्यातून मोन शर्माने परमजीत यांच्यावर गोळ्या झाडल्या.
गोळीबार केल्यानतंर आरोपीचं कुटुंबीय तेथून फरार झाले. परमजीत यांच्या मुलाने पोलिसांना संपर्क केला. पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच त्यांना घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांना तेथे गोळीच्या शेल-(खोळ) सापडल्या. परमजीत हे सिंगापूरमध्ये राहत होते. ते भाच्याच्या लग्नासाठी ५ नोव्हेंबरला भारतात आले होते. २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या भाच्याचा विवाह सोहळा होता.
परमजीतचे कुटुंब सेक्टर-२१सी मधील ६४१ क्रमांकाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहते. आरोपी मोनू शर्माचे कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहत होते. सूरजकुंड पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) प्रल्हाद यांच्या माहितीनुसार, ४-५ दिवसांपूर्वी मोनू आणि शौर्य यांच्यात वाद झाला होता. मात्र, त्यावेळी तो वाद मिटला होता. परमजीत यांचा मुलगा शौर्य याने केलेल्या तक्रारीवरून मोनू शर्मा (उर्फ मोहन), त्याची पत्नी दिव्या, त्यांचा मुलगा मयंक, मुलगी नैना आणि भाऊ हेतराम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. परमजीत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय.
पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, परमजीत यांचा मुलगा शौर्य याने तक्रार नोंदवलीय. त्याने सांगितले की, आरोपी मोहन (मोनू) शर्मा याने घराची बेल वाजवून त्याच्या वडिलांना खाली बोलावले आणि त्यांना त्यांचे वाहन दुसरीकडे हलवण्यास सांगितले. पार्किंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर आरोपीने वाद सुरू केला आणि त्यादरम्यान त्याने गोळी झाडून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी आपल्या वाहनातून घटनास्थळावरून पळून गेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.