Tea  Saam Tv
देश विदेश

Child dies after Drink Tea : चहा प्यायल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या दाव्याने पोलीसही चक्रावले

Madhya Pradesh News : मुलाला चहा प्यायल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

साम टिव्ही ब्युरो

Madhya Pradesh News : चहा प्यायल्याने कुणाचा मृत्यू होऊ शकतो का? कदाचित तुमचं उत्तर नाही असेल. मात्र चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या देवासमध्ये घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या आई केला आहे. मुलाला चहा प्यायल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

सिमरोल पोलिसांनी सांगितलं की, लहान मुलाचे वडील तुरुंगात असल्याने तो आपल्या आजोबांच्या घरी होता. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, चहा दिल्यानंतरच मुलाला अस्वस्थ वाटू लागले. (Latest News Update)

प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला इंदूरच्या चाचा नेहरू रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाला हॉस्पिटलमध्ये आणले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. (Maharashtra News)

रुग्णालयाच्या डॉ. प्रीती मालपाणी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मुलाला रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. त्यामुळे आम्ही मृत्यूच्या कारणावर भाष्य करू शकत नाही.

मात्र एवढ्या लहान मुलाला चहा दिलाच का? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या बालकाचा मृत्यू खरंच चहा प्यायल्याने झालाय की दुसरं काही कारण आहे? या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT