Rapido Bike Crime News
Rapido Bike Crime News Saam Tv
देश विदेश

Bengaluru Rapido Bike Crime News : वाहनचालकाचा संशय येताच महिलेने चालत्या गाडीतून मारली उडी; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO

Ruchika Jadhav

Bengaluru Crime News : रात्री उशिरा बाहेर पडणे अद्यापही महिलांसाठी किती असुरक्षीत आहे याची आठवण करून देणारी एक भयानक घटना समोर आली आहे. रात्री उशिर झाल्याने रॅपिडो बाईकवरून घरी जाताना एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्यासोबत काहीतरी गैर घडत असल्याचे लक्षात येताच या महिलेने थेट चालत्या गाडीतून रस्त्यावर उडी घेतली आहे. (Molestation)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेंगळुरू (Bengaluru) येथे सदर घटना घडली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार २१ एप्रिल रोजी शहरातील इंदिरानगर भागात या तरुणीने एक बाईक राईड बुक केली होती. त्यावेळी प्रवास करताना ड्रायव्हरने या महिलेला ओटीपीसाठी नंबर विचारला. त्यात अडचन येत असल्याने त्याने स्वत: नंबर तपासण्याच्या बहाण्याने तिचा फोन घेतला.

फोन मिळाल्यानंतर वाहन चालकाने अचानक महिलेच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गाडी फिरवली. दुचाकी दुसऱ्या रस्त्याने चालली आहे. आपल्यासोबत काही वाईट घडू शकते. तसेच एकूनच वाहन चालकाचा अंदाज घेत या महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी थेट चलत्या दुचाकीवरून खाली उडी घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक हा थिंडलू येथील रहिवासी असून मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. महिलेने घटनेची माहिती देताच त्यांनी पोलिसांनी आरेपीला ताब्यात घेतलं आहे.तसेच पुढील कारवाई सुरू असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गाडी वेगात पळताना मारली उडी

सदर धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रात्रीच्यावेळी रस्त्यावर काही वाहने चालली आहेत. अशात एका दुचाकीतून महिला खाली उडी घेते.

महिलेने उडी घेतली तेव्हा दुचाकीचा वेग फार असतो. त्यामुळे महिला खाली जोरात पडते आणि दुकाचील पुढे निघून जाते. महिला खाली पडल्यावर तेथून उठून ती पळ काढत असल्याचं दिसत आहे. महिलेला अशा अवस्थेत पाहून तेथे असलेले अन्य वाहन चालक तिच्या मदतीला धावून येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Curd: विरजण नसतानाही घरच्याघरी दही लावायचं? मग जाणून घ्या 'या' सोपी पद्धत

IPL 2024 Playoffs: मुंबईच्या पराभवानं दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! वाचा कसं असेल समीकरण

Today's Marathi News Live: PM मोदींची उद्या पुण्यात सभा; भाजपकडून जोरदार तयारी सुरू

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT