Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News : वाहतूक पोलिसाचं लाजिरवाणं कृत्य; भररस्त्यात नागरिक भयभीत

Traffic Police Crime : या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

सचिन जाधव

Pune Traffic Police News : पुणे येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. विश्रांतवाडी भागात वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्याच्या नशेत दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली आहे. (Crime News)

भर रस्त्यात तलवार उगारुन दहशत माजविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस (Traffic Police) उपायुक्त यांनी दिले आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
Crime News In Pune : संतापजनक! पुण्यात तरुणाची महिलेला मारहाण; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.जाधव मुंढवा वाहतूक शाखेत नियुक्तीस आहे. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पथकाला मिळाली.पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत जाधव वाहतूक शाखेत पोलीस कर्मचारी असल्याचे उघडकीस आले.

तपासात जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या विरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव याची चौकशी करण्यात आली आहे. जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Pune Crime News
Constipation : पोटात सारखा गॅस, पोट होत नाही साफ, हे खा आणि २ मिनीटात मोकळे व्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com