ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकजण आहारात दहीचा हमखास समावेश करतो.
मात्र उन्हाळ्याच्या दिवसात दही ,ताक असे दह्यापासून तयार झालेल्या पदार्थांचा अधिक समावेश आहारात केला जातो.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर ठरते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? विरजण नसतानाही घरच्याघरी दही लावायचं
सर्वप्रथम दूध हलक्या प्रमाणात गरम करुन घ्यावे. त्यानंतर कोमट झालेले दूध एका भांड्यात ठेवावे.
भांड्यात ठेवलेल्या दूधात दोन हिरव्या मिरच्या घाला. मिरची देठासह पूर्णपणे दूधात बुडेल अशा पद्धतीने ठेवा.
हे झाल्यानंतर दूध एका उष्ण ठिकाणी साधारण ६ तास झाकून ठेवा.
अशा पद्धतीने दही विरजण न घालता तयार होईल.