Sangli Crime News : सांगली हादरली!जिवापाड प्रेम करणाऱ्या भावाला त्याने एका क्षणात संपवलं

पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

Sangli News : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात भावाचा सर्वात जास्त आधार वाटतो. मात्र सांगली येथे एक भाऊच आपल्या सख्ख्या भावाच्या जीवावर उठला आहे. सख्या भावाकडून डॉक्टर असलेल्या भावाचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या कुपवाड येथे घडला आहे. धाकट्या भावाने आपल्या थोरल्या भावावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Brother Killed His Elder Brother)

मिळालेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ हा डॉक्टर होता. लहान भावाने त्याच्यावर खुरप्याने हल्ला करून हा खून केला आहे. या घटनेमुळे कुपवाड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित भावाला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.

Pune Crime News
Pune Crime News : वाहतूक पोलिसाचं लाजिरवाणं कृत्य; भररस्त्यात नागरिक भयभीत

डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे असं मृत भावाचं नाव आहे. कुपवाड शहरातल्या जुना मिरज रोडवरील संत रोहिदास मंदिराजवळ त्याचे क्लिनीक होते. तसेच संपत बाबाजी शिंदे असं हत्या केलेल्या लहान भावाचं नाव आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

सकाळच्या सुमारास डॉक्टर अनिल बाबाजी शिंदे हे घरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करत बसले होते. यावेळी अचानकपणे संपत हातात खुरपे घेऊन घरात आला. यावेळी त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बारका भाऊ (Brother) शिव्या देत असल्याने अनिल शिंदे यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संपत फार रागात होता.

Pune Crime News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : परीक्षेत एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; खळबळजनक घटनेनं शिक्षकही हादरले

त्याच्या हातात एक खुरपे होते. भांडत असताना अनिल यांना काही कळण्याआधीच संपतने त्यांच्यावर मोठे वार केले. बारक्या भावाने एकामागोमाग एक सपासप वार केले. यामुळे अनिल धाडकन जमिनीवर कोसळले. वार झाल्याने तो मोठमोठ्याने कळवळू लागला. पती ओरडत असल्याचा आवाज येताच त्यांची पत्नी घरात आली तेव्हा अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

त्यांना तेथून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन संशयित संपत शिंदे याला ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे कुपवाड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com