हॉटेलमध्ये २४ वर्षीय महिलेनं आत्महत्या केली.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली.
पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात आले.
पश्चिम दिल्लीतील टिळक नगर पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत एका महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत महिलेची ओळख पटली असून, ती फरीदाबादची रहिवासी असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी तपास केला असता, त्यांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. यात तिनं तिच्या पतीसोबत सुरू असलेल्या वैवाहिक वादाचा उल्लेख केला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पूजा (वय वर्ष २४) असे मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. यात महिलेनं पतीसोबतच्या वैवाहिक मतभेदाचा उल्लेख केला आहे. पोस्टमॉर्टमनंतर शनिवारी महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पूजाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलिसांना तिलक नगरजवळील एका हॉटेलमध्ये महिलेनं गळफास घेतली असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले.
पोलिसांनी सांगितले की, चौकशीत पूजाच्या पतीचे नाव नरेश असल्याचं आढळून आलं. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यात तिनं पतीसोबत झालेल्या वादाचा उल्लेख केला आहे. महिलेच्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरण्यात आले नाही. पूजाच्या पालकांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास फरिदाबादच्या स्थानिक एसडीएमकडे सोपवण्यात आलाआहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.